Shocking video: कधी कधी विचार न करता घाई-घाईत घेतलेला निर्णय नंतर पश्चाताप करायला भाग पाडतो. काही व्यक्तींमध्ये जरा जास्तच उत्साह असतो. याच उत्साहाला उधाण आलं की उत्साह कधी अनाठायी धाडसामध्ये बदलून जातो ते कळतही नाही. कधी कधी काही धाडसी प्रयोग यशस्वी होतात. पण हेच प्रयोग अंगलट येऊन अगदी जीव जाईपर्यंतची अनेक उदाहरणे आपण आपल्या आजुबाजुला बघतच असतो. दररोज जे काही अपघात होतात त्यातले २० टक्के अपघात तरी विनाकरण काहीतरी अतिधाडस केल्याने हतात. आता हेच बघा ना या कार चालकाचंही असंच. ज्यामध्ये एक कार ड्रायव्हर लहान आणि अरुंद पुलावरून पूर आलेला असताना कार बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो, तर त्याच्या खालून एक वेगवान नदी वाहत असून नदीला पूर आला आहे. अशा पद्धतीने हिंमत करणाऱ्या लोकांची आपल्याकडे काही कमी नाही. मात्र हा व्हिडीओ पाहून तुम्हीही श्वास रोखून धराल…

सोशल मिडियावर हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतो आहे. काही जणांना या कार चालकाची हिंमत आवडली आहे, तर काही जणांना अशी जिवावर उदार होऊन केली जाणारी हिंमत म्हणजे मुर्खपणा वाटतो आहे.

5 superfoods that can help prevent clogged arteries
रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होऊ नये म्हणून खा हे पाच सुपरफूड! तज्ज्ञांचा सल्ला
china biggest dam in the world
चीनमधील ‘या’ अवाढव्य धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावला? धरणाचा…
attempt to murder akshay shinde marathi news
“आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही”, बंदूक हातात येताच अक्षय शिंदे याने पोलिसांवर झाडल्या गोळ्या, हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल
Counselling Different behaviors by mother with two sisters
समुपदेशन : आईकडून बहिणींमध्ये दुजाभाव?
AC Side Effects Know what happens to the body if you sit in an AC room all day every day
AC Side Effects: तुम्हीही दिवसभर एसीमध्ये बसता का? शरीरावर काय परिणाम होतो? वाचा…
Night shift workers, here’s how you can experience REM sleep What is the REM sleep?
झोप नाही तर गाढ झोप घेणं आहे गरजेचं; नाईट शिफ्टमध्ये काम करत असाल तर डॉक्टरांनी दिलेला सल्ला एकदा पाहा
Alankrita Sakshi’s Success Story
Alankrita Sakshi : अलंकृतासारखे तुम्हीही Google मध्ये नोकरी मिळवू शकता; बीटेक, मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये काम अन् या आयटी स्कीलच्या जोरावर मिळवले ६० लाखांचे पॅकेज
pradnya daya pawar
‘भय’भूती: भित्यंतराचे कल्लोळ

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, प्रचंड मोठी नदी वाहत, त्या नदीला पूर आल्यामुळे पुलाच्या वरुन पाण्याचा प्रवाह जात आहे या पुलाची अवस्था फारशी चांगली वाटत नाहीये. म्हणजेच कधी पुल तुटेल याचाही नेम नाही अशी एकंदरीत परिस्थिती दिसत आहे. मात्र या कार चालकानं पुढे धोका दिसत असूनही मृत्यूच्या दारातूनच जायचं ठरवलं. एक छोटीशी चूक आणि कार थेट नदीत पडेल असे वाटते. तेच पुढच्याच क्षणी पाण्याच्या प्रवाहातून कारला पुढे जाता येत नाही आणि कार पुराच्या पाण्यात वाहून जाते. सोबतच पूर आल्यामुळे पाण्याने रौद्ररुप धारण केलं होतं, त्यामुळे पुढच्याच क्षणी पूलही वाहून गेला.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: एक डुलकी मृत्यूची! गाडी चालवताना डोळा लागला आणि घात झाला; अवघ्या २ सेंकदात भीषण अपघात

हा व्हिडीओ सोशल मीडियावर crane.rasool नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर नेटकरीही संताप व्यक्त करत प्रतिक्रिया देत आहेत, एका युजरने म्हंटलंय “घाईत घेतलेला निर्णय नंतर पश्चाताप करायलाही वेळ देत नाही” तर दुसरा म्हणतो, “यांच्या या मूर्खपणामुळे ते आपला जीवही धोक्यात घालतात.”

धाडस, शौर्य आणि मूर्खपणा यांच्यामध्ये मोठा फरक आहे. पण हे अनेक लोकांना कळत नाही. त्यांचा मूर्खपणा, अतिशहान शहानपणा त्यांना कधी कुठे कसा नडतो हे त्यांच माहिती नसतं. सोशल मीडियावर एका व्यक्तीचा असाच मूर्खपणाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.