Accident Viral Video: रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये काही अपघात हे वाहन चालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात, तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो अक्षरश: अंगावर काटा आणत आहे.काही दिवसांपासून देशभरात हिट ॲण्ड रनची प्रकरणं दिवसेंदिवस वाढताना दिसतायत. अशा घटनांवर कायदेशीर कारवाई केली जाते. मात्र, त्यानंतरही अशा घटना कमी होण्याचे नाव घेत नाहीत. पण, यात सर्वसामान्य लोकांना नाहक जीव गमवावा लागतोय. अशाच प्रकारच्या हिट ॲण्ड रनच्या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ एक उदाहरण म्हणूनदेखील समोर आला आहे, ज्याला पाहून तुम्ही रस्त्यावरुन चालताना किती सतर्क राहायला पाहिजे हे दाखवत आहे.

कर्नाटकातील मंगळुरू येथील एका निवृत्त बीएसएनएल कर्मचाऱ्याला त्याच्या शेजाऱ्याच्या मोटारसायकलस्वाराला जाणूनबुजून गाडी धडकवून खून करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. १३मार्च रोजी बिजाई कपिकड येथील साहाव्या मेन रोडवर घडलेल्या घटनेनंतर बेजाई येथील रहिवासी ६९ वर्षीय सतीश कुमार केएम याला ताब्यात घेण्यात आले.

अंगावर काटा आणणारा अपघात

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, मोकळा रस्ता आहे, यावेळी एक महिला रस्त्याच्या बाजूनं चालत जात आहे. याचवेळी अचानक समोरुन एक कार येते आणि महिलेला जोरदार धडक देते. महिलेला एवढ्या जोरात धडक बसते की ही महिला उडून थेट बाजूच्या कंपाउंडवर असलेल्या लोखंडी सळईवर जाऊन अडकते. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, महिलेचा पाय लोखंडी सळईवर अडकला असून ती वेदनेनं ओरडत आहे. काहीवेळानं त्या ठिकाणी लोक जमा होतात आणि महिलेला खाली आणतात. यावेळी महिलेला गंभीर दुखापत झाल्याचं दिसत आहे.

नेमकं प्रकरण काय?

पोलिसांनी सांगितलं की, आरोपीचा पीडित मुरली प्रसादशी सतत वाद होत होता. २०२३मध्ये उरवा पोलिसांनी मुरली प्रसादचे वडील दुचाकीवरून जात असताना त्यांच्याशी शाब्दिक शिवीगाळ आणि धडक दिल्याबद्दल त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता.मुरली प्रसादची वाट पाहत सतीश कुमार गाडीत बसले होते. मुरली प्रसाद दुचाकीवर बसताच सतीश कुमार यांनी वेगाने गाडी त्याच्या दिशेने पळवली आणि जीवे मारण्याच्या उद्देशाने धडक दिली. पण याचा फटका रस्त्यावरुन चालत निघालेल्या एका महिलेलाही बसला. महिला गंभीर जखमी झाली असून, तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मुरली प्रसादही गंभीर जखमी असून रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर दररोज अपघातांशी संबंधित व्हिडीओ शेअर केले जातात. ज्यातील काही व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो. हे अपघात टाळण्यासाठी एकच उपाय आहे, तुम्ही सदैव सावध राहा. @HateDetectors नावाच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हि़डीओ पोस्ट करण्यात आला असून, या व्हिडीओला लोक वारंवार पाहात आहेत. एकानं म्हंटलंय “देवा इतकं वाईट कुणासोबतच होऊ नये” तर आणखी एकानं, यावर कारवाईची मागणी केलीय.

Story img Loader