Shocking video: स्ट्रीट फुड म्हणून मोमोज आता अल्पावधीतच लोकप्रिय झालं आहे. हिमालयाची फेमस डिश असलेल्या मोमोजचे स्टॉल आता गल्लीगल्लीत सुरू झाले आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने बनवलेल्या मोमोज अनेकांचे फेव्हरेट फुड झाले आहे. त्यात स्ट्रीट फुड म्हटले की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. पण हेच स्ट्रीट फुड तुमच्या जीवावर उठू शकते. कारण एका मोमोज विक्रेत्याचा धक्कायदाक व्हिडीओ सध्या समोर आला आहे, यामध्ये ज्या पद्धतीने मोमोज बनवतोय त्याचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही मोमोज खाताना शंभर वेळा विचार कराल एवढं नक्की.

विक्रेत्याचा ‘किळसवाणा VIDEO पाहून झोप उडेल

एका विक्रेत्याने पायाने मोमोचे पीठ मळले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ जबलपूरचा आहे जो शुक्रवारी दुपारी सोशल मीडियावर व्हायरल आला. २२ सेकंदांच्या व्हिडीओमध्ये, एक तरुण आपल्या पायांचा वापर करून पीठ तयार करताना दिसत आहे, जे मोमोजसाठी आहे. यामुळे आता जबलपूरच्या रहिवाशांमध्ये स्वच्छतेबाबत मोठी चिंता निर्माण झाली आहे. मोमोजसोबत दिली जाणारी लाल चटणीही आवडीने खाल्ली जाते. तिखट अशी ही चटणीदेखील शरीरासाठी हानिकारक असते. कारण या चटणीची गुणवत्ता कमी असते. ज्यामुळं मूळव्याध, जठराची सूज, पोट आणि आतड्यांमध्ये रक्तस्त्राव होऊ शकतो.

खाण्यापूर्वी १०० वेळा विचार कराल

बाजारात आधीच मोठ्या प्रमाणावर आपली फसवणूक होत असते. भेसळयुक्त पदार्थ, प्रक्रिया केलेले पदार्थ खाण्याशिवाय आता आपल्याला पर्याय नाही. कारण आता सर्वच पदार्थांमध्ये भेसळ केली जाते, त्यामुळेच हल्ली आजारी पडण्याचं प्रमाण वाढलं आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> शिक्षक दिन सुरु असताना तरुणानं तिसऱ्या मजल्यावरुन मारली उडी; थरारक घटनेचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल

शुक्रवारी हा व्हिडिओ समोर आला असून, जबलपूरच्या रहिवाशांमध्ये स्वच्छतेबाबत मोठी चिंता निर्माण झाली आहे. जबलपूरच्या रहिवाशांनी याचा तीव्र निषेध केला आणि जबलपूर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. मिळालेल्या माहितीनुसार, जबलपूरमधील बरगी पोलीस ठाण्याजवळ हा खाद्यपदार्थाचा स्टॉल आहे आणि तो राजस्थानमधील विक्रेते चालवत होते.राजकुमार गोस्वामी आणि सचिन गोस्वामी अशी दोन आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. हे दोघे राजस्थानमधील जोधपूरचे रहिवासी आहेत. संतप्त रहिवाशांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे दोघांवरही संबंधित कलमांतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.