Shocking video: असं म्हणतात की आजी आणि नातवंडांचे नाते खूप खास असते. त्यांच्या नात्यात प्रेम, काळजी आणि जिव्हाळा असतो. आजी-आजोबा आणि नात किंवा नातू हे नाते विलक्षण वेगळे असते. नातवाचे पहिले मित्र हे आजी-आजोबाच असतात. नात्याची खरी जडण घडण तिथूनच होत असते. आजी-आजोबांच्या या घट्ट नात्याची ओळख नातवांशी होणे हे आजच्या काळात महत्त्वपूर्ण आहे. आजी म्हणजे नातवंडांची जणू दुसरी आईच असते. मात्र, सध्या समोर आलेला व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल; कारण छत्तीसगडची राजधानी रायपूर येथील एक अस्वस्थ करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक तरुण आपल्या वृद्ध आजीला क्रिकेटच्या बॅटने बेदम मारहाण करताना दिसत आहे. रायपूरच्या पुरानी बस्ती पोलिसांच्या अखत्यारीतील अमर पुरी भागात ही धक्कादायक घटना घडली असून त्याचा काळीज हेलावणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा