Shocking video: आजच्या तरुण पिढीने सगळीच लाज सोडली आहे का असाच प्रश्न पडला आहे. आता दिवसाढवळा रस्त्यावर तरुणाई अक्षरश: हद्दच पार करत आहे. हे अशाप्रकारे कृत्य समाजात आक्षेपार्ह आहे. शिवाय रस्त्यावर अशा गोष्टी करणे म्हणजे वाहतुक नियमाचं उल्लंघनदेखील आहे. भर रस्त्यावर धावत्या बाईकवर रोमान्स करताना एक जोडप कॅमेऱ्यात कैद झाले आहे. वाहतूक नियमाचं उल्लघंन केल्याप्रकरणी पोलिसांनी अशा बाइकस्वारांवर कारवाईही केली. मात्र पोलिसांचा धाक या प्रेमी युगुलांवर दिसून येत नाही आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या व्हिडिओमध्ये एक तरुण जोडपं चालत्या बाईकवर रोमान्स करत असल्याचं दिसून येतं.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये एक जोडपे वेगाने बाईक चालवताना धोकादायक स्टंट करताना दिसत आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून तरुणी बाईकच्या इंधन टाकीवर बसून बाईक चालवणाऱ्या आपल्या जोडीदाराला मिठी मारत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. व्हायरल व्हिडिओने सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे कारण हे जोडपे वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना आणि महामार्गावर धोकादायक स्टंट करताना आपला जीव धोक्यात घालताना कॅमेऱ्यात कैद झाले होते.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुणी समोरच्या बाजूनं तरुणाच्या मांडीवर त्याला मिठी मारुन बसली होती. हे जोडप अख्खा शहरात असे फिरत होते, तर मधून मधून ती तरुणी त्या तरुणाला किस करत होती. या व्हिडीओमध्ये तु्म्ही पाहू शकता, हायवेच्या मधोमध दुचाकीस्वार वेगात दुचाकी चालवत असताना महिला दुचाकीच्या इंधन टाकीवर बसल्याचे व्हिडिओत दिसत आहे. बाईक काळ्या रंगाची बजाज पल्सर असल्याचे दिसते. या घटनेचा व्हिडीओ एका प्रवाशानं रेकॉर्ड केला आहे जो त्याच्या कारमधून महामार्गावर प्रवास करत होता आणि त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> आळशी सुनेचा अजब जुगाड! सासूने चपाती बनवायला सांगितल्यावर असं काही केलं की ९ कोटी लोकांनी पाहिला हा Video
यादरम्यान या दोघांना पाहून सगळेच हैराण झाले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अशा प्रकारे रस्त्यावर हे कृत्य करणं जोडप्यासाठी फक्त धोकादायकच नाही तर वाहतुकीच्या नियमांचंही उल्लंघन असल्याचं लोकांचं म्हणणं आहे. यासोबतच सामाजिकदृष्ट्या ही घटना अत्यंत अशोभनीय आहे. जोडप्याला रस्त्यात असं कृत्य करताना पाहून मुलांवरही परिणाम होईल, असं अनेकजण म्हणाले. तर एकानं “अरे जरा तरी लाज बाळगा” अशी प्रतिक्रिया दिली आहे.