Accident Viral Video: रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये काही अपघात हे वाहन चालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात, तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो अक्षरश: अंगावर काटा आणत आहे. हा व्हिडीओ एक उदाहरण म्हणूनदेखील समोर आला आहे. गुजरातमध्येही असाच भयंकर अपघात झाला आहे. एक ट्रक आणि कारची धडक झाली आहे. ही धडक इतकी भयंकर होती की कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाला आहे. या अपघातात कारमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. तर दोघं जखमी झाले आहेत. दोन्ही जखमी लहान मुलं आहेत जी चमत्कारिकरित्या बचावली आहेत. या अपघातानंतर या गाड्यांची अवस्था जर तुम्ही पाहिली तर तुम्हालाही धक्का बसेल मात्र यातूनही दैव बलवत्तर होते म्हणूनच दोन्ही लहान मुलं वाचली आहेत.

तुम्ही कितीही सावधगिरी बाळगली तरीदेखील अनेकदा दुसऱ्याच्या चुकीमुळे अपघात घडतात. नुसतं गाडी चालवतानाच नाही तर रस्त्यावरून चालतानादेखील लोकांनी लक्ष ठेवलं पाहिजे. अशातच प्राण घ्यायला आलेल्या यमराजाला माणसाने परत पाठवल्याचं तुम्ही बऱ्याच फिल्ममध्ये पाहिलं आहे. असं प्रत्यक्षात शक्य नाही हे आपल्यालाही माहिती आहे, कारण मृत्यू कुणाच्या हातात नाही. पण, तरी फिल्मी लाइफप्रमाणे रिअल लाइफमध्ये असा चमत्कार दिसून आला.

Shocking video of young girl standing outside of train door doing stunt for reel viral video on social media
“तिचं एक पाऊल तिला मृत्यूच्या दारात घेऊन गेलं”, ट्रेन अपघाताचा ‘असा’ VIDEO तुम्ही कधीच पाहिला नसेल…
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Weeding Viral Video
‘तिच्या लग्नातील मंगलाष्टके ऐकताच…’ त्याला अश्रू झाले अनावर; शेवटी हुंदके देत रडला… काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच
China man revived after heart attack
रेल्वे स्थानकावर आला हृदयविकाराचा झटका; शुद्धीवर येताच म्हणाला, “मला कामाला जाऊ द्या”
leopard Milkman bike video
दुचाकीस्वार अन् बिबट्याची जोरदार धडक; रस्त्यात कोसळला अन् पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा, भयानक VIDEO व्हायरल
Google Amazon Microsoft Meta Other Tech Companies Have Cut Jobs
२०२५ मध्ये टेक कर्मचाऱ्यांच्या अडचणीत वाढ? कारण काय? गुगल, मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्यांमध्ये का सुरू आहे नोकर कपात?
Tanaji Sawant Son Missing
Tanaji Sawant Son Missing : तानाजी सावंतांचा मुलगा ऋषीराज सावंत सुखरुप परतला; नेमकं काय झालं होतं? पुणे पोलिसांनी दिली मोठी माहिती
Viral Video Surat
VIDEO : बीएमडब्ल्यू, मर्सिडीजसारख्या ३० अलिशान गाड्या रस्त्यावर उभ्या केल्या अन्…; शाळकरी मुलांंच्या ‘त्या’ कृत्याने सर्वच हैराण!

नेमकं काय घडलं?

अहमदाबाद-वडोदरा एक्सप्रेसवेवरील ही घटना आहे. १० फेब्रुवारीला सकाळी इथं अपघात झाला. एक कार एका ट्रकला धडकली. कारमध्ये चार जण होते. आईवडील आणि दोन मुलं. कार ट्रकला इतक्या जोरात धडकली की ती ट्रकमध्ये अडकली. या दुर्घटनेत जोडप्यांचा मृत्यू झाला आहे. पण त्याचवेळी एक चमत्कारही पाहायला मिळाला. अपघात इतका भीषण होता की कारचा चेंदामेंदा होऊन पती-पत्नीचा मृत्यू झाला. पण त्याच कारमधील दोन मुलं बचावली. दोन्ही मुलं या कार अपघातात मृत्यू झालेल्या जोडप्याचीच आहेत.हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, नशीब असावं तर असं.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर दररोज अपघातांशी संबंधित व्हिडीओ शेअर केले जातात. ज्यातील काही व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो. हे अपघात टाळण्यासाठी एकच उपाय आहे, तुम्ही सदैव सावध राहा. @AHindinews नावाच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हि़डीओ पोस्ट करण्यात आला असून, या व्हिडीओला लोक वारंवार पाहात आहेत. तसेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत आहेत 

Story img Loader