Couple viral video: आजकाल सोशल मीडियावर प्रेमाच्या नावाखाली अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. काही जोडपी प्रेमाच्या मर्यादा ओलांडून सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्ये करताना दिसतात. त्यांच्या या कृतीमुळे आजूबाजूच्या लोकांना त्रास होतो, पण त्याकडे दुर्लक्ष केले जाते. ही जोडपी एकमेकांच्या प्रेमात इतकी बुडेलेली असतात की आपण कुठे आहोत, याचं भान देखील त्यांना उरत नाही. यापूर्वी स्टेशनवर रोमान्स करणाऱ्या अनेक कपलचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.असाच एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये कपल एका इमारतीच्या मागे रोमान्स करताना दिसतात. यावेळी एका काकांनी बाल्कनीतून त्यांना पाहिले आणि त्यांच्यासोबत असं काम केलं की पाहून तुम्ही हैरान व्हाल.

प्रेम करताना वेळ, जागा कधीही पाहू नये असे म्हटले जाते. जसजसा काळ बदलला तसतशा प्रेमाच्या व्याख्याही बदलल्या. आजकाल तरुण तरुणी कोणत्याही गोष्टीचे भान न ठेवता सार्वजनिक ठिकाणी नको ते चाळे करू पाहतात. सर्वांसमोर आपल्या प्रेमाचे प्रदर्शन करू लागतात. असे करताना आजूबाजूच्या परिसराचा ते विचार करत नाहीत. प्रेम व्यक्त करताना आजूबाजूच्या परिस्थितीचे भान ठेवणेही तितकेच गरजेचे असते. आपल्यामुळे इतरांना त्रास तर होत नाही ना याची काळजी घेतली पाहिजे. सोशल मीडियावर नेहमीच प्रियकर प्रेयसीचे अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात. यात बऱ्याचदा ते नको ते चाळे करताना दिसून येतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका घराच्या मागे कपलचा रोमान्स सुरु आहे. यावेळी पहिल्या मजल्यावरून एक काका त्यांच्या या कृत्यावर लक्ष ठेवून होते, जसेच हे जोडपे रोमान्स करायला लगाले, तसे काकांनी बाल्कनीतून त्यांना जोरात आवाज दिला आणि ओरडले.अचानक आवाज ऐकताच दोघंही घाबरतात आणि तरुण गर्लफ्रेंडला तिथेच सोडून पळून जाण्याचा प्रयत्न करतो. यावर सर्व संतापले असून तरुणावर टीका करत आहेत. तिला एकटीला सोडून तो कसा काय पळून जाऊ शकतो असा सवाल आता नेटकरी करत आहेत. तसेच मुलींना चुकीच्या मुलावर प्रेम करु नका असं आवाहनही केलं जातंय.

पाहा व्हिडीओ

हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला असून अनेक युजर्सनी यावर संताप व्यक्त केला आहे. काहींनी या जोडप्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे तर काहींनी काकांचे कौतुक केलं आहे.