Viral video: सोशल मीडियावर सतत आपल्याला नवनवे व्हिडिओ पाहायला मिळतात. सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. यात अनेक व्हिडिओ मजेशीर असतात. मात्र काही व्हिडिओ असे असतात जे पाहून काळजाचा ठोका चुकतो. हे व्हिडिओ अनेकदा धडकी भरवणारे आणि विचार करण्यास भाग पाडणारे असतात. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. गाईनं अनेकांची काय अवस्था केली आहे, ते तुम्ही व्हिडीओत पाहू शकता. पिसाळलेली गाय ज्या प्रकारे महिला, लहान मुलगा आणि वृद्धावर हल्ला करत आहे ते पाहून कोणाचाही थरकाप उडेल.
प्राणी आणि जनावरांची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रस्त्यावर चालणाऱ्या लोकांच्या मनात भिती बसली असून हे प्राणी, जनावरे कधी कोणावर हल्ला करतील सांगू शकत नाही. एक व्हिडीओ समोर आलाय ज्यामध्ये एका गायीने जीवघेणा हल्ला केला. वारंवार शिंगाने उचलून आपटून पायाने तिनं अनेकांना जखमी केलं. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून याचा व्हिडीओ खळबळ उडवत आहे. रस्त्यावर अनेक भटके प्राणी फिरत असतात. कुत्रे, गायी, म्हशी, बैल, असे वेगवेगळे प्राणी रस्त्यावर दिसतात. कधी कधी हे प्राणी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर हल्ला करतानाही दिसतात. त्यामुळे भटक्या प्राण्यांविषयी लोकांच्या मनात दहशत निर्माण झाली आहे. कधी कधी पाळीव प्राणीही संतापात हल्ला करताना दिसून येतात.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ही गाय रस्त्यावरुन सुसाट पळत आहे, यावेळी एक महिला रस्त्याच्या कडेला उभी आहे. ही पिसाळलेली गाय तिथे येते आणि महिलेवर हल्ला करत तिला शिंगावर घेऊन फेकून देते. एवढ्यावरच ही गाय थांबत नाही ती तिला अक्षरश: पायानी तुडवते, शिंग मारते. ही गाय इतकी आक्रमक आहे की आजूबाजूचं कुणीही या महिलेला वाचवण्याचं धाडस करत नाहीये. यानंतर ही गाय एका लहान चिमुकल्यालाही आल्या शिंगांनी उडवते तर आणि पुढे जाऊन एका वृद्ध व्यक्तीलाही जखमी करते. गायीच्या हल्ल्याचा थरारक व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल.
पाहा व्हिडीओ
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण चर्चा करत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया वर nadim_shaikh1013 नावाच्या इनस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे, ज्याला आतापर्यंत २६ हजाराहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. व्हिडीओ नेमका कोणत्या ठिकाणचा आहे हे स्पष्ट झालं नाही. प्राण्यांचे असे व्हिडीओ सोशल मीडियावर कायमच पहायला मिळते. भटक्या प्राण्यांच्या अशा दहशतीमुळे लोकांच्या मनात भिती बसली आहे.