Shocking video: सोशल मीडियावर सध्या काही तरुणींच्या हाणामाराची व्हिडिओ व्हायरल होत आहे. तरुणींची ही हाणामारी साधारण नसुन अतिशय भयानक आहे,ज्यात दोघी एकमेंकीना लाथा-बुक्क्यांनी मारत आहे. याआधीही असे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.आजच्या तरुण पिढीला संयम नाही असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मुलं असो किंवा मुली क्षुल्लक कारणामुळे होणार वाद हे टोकाला पोहोचतात आणि त्यांचं रुपांतर हाणामारीत होतं. त्यात या पोरींचा हाणामारीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंड होतं आहे. भारतीयांसाठी तरुणींची हाणामारी काय नवीन नाही.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ दिल्लीतला असून व्हिडिओत तुम्हाला दोन तरुणी दिसत आहेत. या दिल्लीतील GNIMS कॉलेजच्या परिसरात ही हाणामारी करत असून त्यातील एक तरुणी सुरुवातीस दुसऱ्या तरुणीस जमिनीवर पाडून तूफान मारत आहे. मारता मारता ती तिचे अक्षरश: केस जोरात ओढत, लाथा-बुक्क्यांनी मारत आहे. अक्षरश: तिचे कपडे फाटले तरी ती खाली पडलेल्या मुलीला सोडत नाहीये. काही वेळाने दुसरी तरुणीही पहिल्या तरुणीस मारण्यास लागते. यावेळी एक तरुणी तिथे येते आणि मध्यस्थी करत भांडण सोडवण्याचा प्रयत्न करते मात्र तरुणी ऐकायला तयारी नाही. ही संपूर्ण झालेल्या हाणामारीचे कारण कळू शकलेले नाही. तरुणींच्या मारामारीचा व्हिडिओ कुणीतरी कॅमेऱ्यात कैद केला आहे. त्यानंतर सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत असून याची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
मुलांचे असो किंवा मुलींचे असो…. हाणामारीचे व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होत असतात. वेगवेगळ्या कारणामुळे नेहमीच मुलांमध्ये असो किंवा मुलींमध्ये वाद होत असतात आणि त्याचं रूपांतर हाणामारीमध्ये होत. त्यांच्या हाणामारीचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. अनेकदा फ्री स्टाईल हाणामारीचे व्हिडीओ व्हायरल होत असतात.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> VIDEO: आता तर हद्दच पार केली! बाईकवर आला अन् महिलेला अश्लिल स्पर्श करुन गेला; मात्र पुढे काय घडलं ते पाहाच
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,”पोरीही कमी नाहीत” तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,”अरे बापरे अगं सोड जीव जाईल तिचा” तर अनेक यूजर्संनी लिहिले आहे की,”काय सुरु आहे ते कॉलेज आहे याचं तरी भान ठेवलं पाहिजे”
सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.