Fight between Neighbours: सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असतात. यात अनेकदा भांडणाचे, मारामारीचे व्हिडीओ असतात, जे पाहून अक्षरश: धक्काच बसतो. अनेकदा या वादाचं रुपांतर मारामारीत होतं. तर अनेकदा अशीही परिस्थिती येते जिथे समोरच्याची चूक नसतानाही त्याला ऐकून घ्याव लागतं. सध्या असाच काहीसा प्रकार एका ठिकाणी घडलाय ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात एका महिलेचं आणि पुरूषाचं कड्याकाचं भांडणं झालंय, नेमकं काय घडलं ते जाणून घेऊ या…
दोघांचं भांडण व्हायरल (Broom Fight goes viral)
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. यात एक महिला आणि एक माणूस घरा बाहेर थोड्या अंतरावर कचरा मारताना दिसत आहे. दोघांची कचरा मारण्यासाठी अगदी जोरात स्पर्धा सुरू आहे. पण या स्पर्धेचं रागात आणि भांडणात कधी रुपांतर होतं हे कळतंच नाही. या व्हिडीओत आपण पाहू शकतो की, महिला सुरूवातीला झाडू घेऊन कचरा मारताना दिसतेय, तर समोरून एक माणूस येतो आणि तोही जोरजोरात झाडू मारत कचरा काढताना दिसतो. अशात झाडू मारता मारता महिला त्या माणसाच्या अंगावर झाडूने मारते आणि तेवढ्यात दोघांमध्ये झाडूची मारामारी सुरू होते.
झाडूने मारामारी सुरू असतानाच माणूस महिलेला खाली ढकलून देतो, यामुळे रागावलेली महिला त्या माणसाच्या अंगावर धावून जाते. आणि त्या दोघांमध्ये कड्याक्याची भांडणं आणि मारामारी होते. तेवढ्यात एक मुलगी भांडण सोडवण्यासाठी तिथे जाते आणि दोघंही आपाआपल्या दिशेने जातात.
व्हिडीओची लिंक
https://www.instagram.com/pachaaa_parishkari/reel/DFK3N73ycWy/
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या हा व्हिडीओ @pachaaa_parishkari या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला तब्बल ४.६ मिलियन व्ह्यूज आले आहेत.
युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “हेच तर होत भारतात.” तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “बायकांवरती काय हात उचलतो हा” तर एकाने “स्वच्छ भारताला दोष द्या”अशी कमेंट केली. एकजण कमेंट करत “जरी मुख्यमंत्री यांचं भांडण थांबवायला आले तरी ते थांबणार नाहीत.” असंही म्हणाला.
दरम्यान, ही घटना नेमकी कुठे घडलीय हे अद्याप कळू शकले नाही. व्हायरल झालेल्या या व्हिडीओचे संपूर्ण ४ भाग आहेत. त्याचा दुसरा भाग जरा जास्तच व्हायरल झाल्यामुळे सध्या चर्चेत आहे.