Shocking Video Viral : खासगी बसमधील भांडणाचे, प्रवासादरम्यान घडणाऱ्या घटनांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यात आता एका परदेशी जोडप्याच्या खासगी स्लीपर बसमधील प्रवासाबाबतचा एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत या परदेशी जोडप्याने बसमधील स्लीपर कोचमधील २० तासांच्या प्रवासादरम्यान काय केले याविषयीची धक्कादायक गोष्ट सांगितली आहे. बसचा क्लीनर जेव्हा सीट्सची साफसफाई करण्यासाठी आला होता तेव्हा त्याला खाली काही धक्कादायक गोष्टी आढळून आल्या. या घटनेची माहिती देणारा व्हिडीओ आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय.

व्हिडीओत दावा करण्यात आला आहे की, यूट्यूब चॅनेल चालवणाऱ्या या परदेशी जोडप्याने जोधपूर ते मुंबई प्रवासादरम्यान त्यांच्या सीटवर कंडोम आणि सिगारेटचा वापर केला होता. एका अहवालानुसार, हे परदेशी जोडपे भारतात फिरण्यासाठी आले असताना ते एका खासगी ट्रॅव्हल बसच्या स्लीपर कोचमधून प्रवास करीत होते. प्रवास संपल्यानंतर जेव्हा बस आगारामध्ये पोहोचली आणि क्लीनर साफसफाई करण्यासाठी आला, तेव्हा त्याला सीट्सखाली काही वस्तू पडलेल्या आढळून आल्या. या वस्तूंमध्ये कंडोम आणि सिगारेटचा समावेश होता, जे पाहून क्लीनरलादेखील धक्का बसला. या बसच्या क्लीनरने पुरावा म्हणून व्हिडीओ बनवला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला.

व्हिडीओमध्ये क्लीनर सीट्सखाली त्या पडलेल्या वस्तू दाखविताना दिसतोय. दरम्यान, अनेकांनी या व्हिडीओच्या कमेंट्स सेक्शनमध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. @reflectlifestyle नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा धक्कादायक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

या व्हिडीओवर एका युजरने कमेंटमध्ये म्हटलेय, प्रवाशांच्या गोपनीयतेचा आदर करणे हे बस ऑपरेटरचे कर्तव्य आहे; परंतु प्रवासानंतर सीट स्वच्छ ठेवणे ही प्रवाशांची जबाबदारी आहे.” दुसऱ्या युजरने लिहिले की, प्रवासाची मजा नक्कीच द्विगुणीत झाली असेल. तिसऱ्याने लिहिले की, भाऊ, हॉटेल्स वगैरे पुरेसे नव्हते म्हणून बसचे हॉटेलमध्ये रूपांतर करण्यात आले.