Viral Video : सोशल मीडियावर दर दिवशी अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ अंगावर काटा आणणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. भर पावसात रस्त्यावर घडलेल्या थरारक घटनेचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला विजेच्या प्रवाहामुळे रस्त्यावर साचलेल्या पावसाच्या पाण्यात आग लागलेली दिसून येईल. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. (Shocking Video: Fire Ignited by Electricity in Flooded Road)
नेमकं का घडले?
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला धो धो पाऊस पडताना दिसत असेल. पावसाच्या पाणी रस्त्यावर साचले आहे. रस्त्याने नदी नाल्याचे स्वरुप घेतले आहे. व्हिडीओत तुम्हाला आग लागलेली दिसेल. सुरुवातीला व्हिडीओ पाहिल्यानंतर पाण्यात आग कशी काय लागू शकते, हा विचार तुमच्याही मनात आला असेल. पण ही आग विजेच्या प्रवाहामुळे लागली आहे. व्हिडीओत तुम्हाला एका बाजूला ट्रॅफिक सिग्नलवर लोक थांबलेली दिसत असेल.ते सुद्धा आश्चर्याने पाण्यात लागलेल्या या आगीकडे पाहताना दिसत आहे.
व्हिडीओतून तुमच्या लक्षात येईल की रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून गाडी काढताना सावध राहणे आवश्यक आहे.
व्हायरल व्हिडीओ (Viral Video)
aashiqkhan9859 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “देवा या रस्त्यावर जितके लोक आहेत, त्यांना सर्वांना सुरक्षित ठेव.”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने मजेशीरपणे लिहिलेय, “हा वीज विभागाचा अनार आहे.” तर एका युजरने लिहिलेय, “शासनाला विनंती आहे की, सर्व ट्रान्सफॉर्मरजवळील मोठ्या बोर्डवर विद्युत विभागाचा हेल्पलाईन क्रमांक लिहावा, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत कोणालाही फोन करता येईल आणि लाइन खंडित करता येईल” आणखी एका युजरने लिहिलेय, “मला आशा आहे सर्व लोक सुरक्षित असतील.” अनेक युजर्सनी प्रतिक्रियांच्या माध्यमातून काळजी व्यक्त केली आहे.
यापूर्वी रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे अपघात घडलेले अनेक प्रकरणे उघडकीस आले आहेत. त्यामुळे रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून गाडी काढताना काळजी घेणे व सतर्क राहणे आवश्यक आहे.