Viral Video: सध्या लग्नसराईचे दिवस सुरू असून सोशल मीडियावर लग्नातील रिल्स, फोटो सतत व्हायरल होत असतात. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमध्ये लग्नातील अनेक गमतीजमती, अनोख्या प्रथा, हटके उखाणे आपल्याला पाहायला मिळतात. सध्या असाच एक भन्नाट व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात लग्नातल्या वरातीमध्ये नवरदेवाच्या मित्रांनी चांगलाच प्रताप केलाय. आयुष्यात मित्र खूप महत्त्वाचे असतात, असं म्हटलं जातं. एकीकडे ते आपल्या प्रत्येक सुख-दुःखात आपल्या सोबत असतात तर दुसरीकडे मस्ती करण्यातही तितकेच पुढे असतात. काही अगदी बॉडीगार्डप्रमाणे सतत आपल्या आजूबाजूला असतात तर काही लोकांमध्येही आपली मस्करी करण्याची संधी सोडत नाहीत. लग्नात तर मित्र अगदी विचित्र मस्करी करताना दिसतात. अनेकदा मित्रांचे कारनामे सोशल मीडियावर व्हायरल होतात, असाच एक लग्नातील नवरदेवाच्या वरातीत मित्रांचा अतिउत्साह त्यांच्या चांगलाच अंगलट आलाय. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा