Viral video: लहान मुलींपासून वयस्कर महिलांची सुरक्षा ही जगभरातील मोठी चिंता आहे. देश कुठलाही असो तरुणी असो वा विवाहीत महिला यांच्यासोबत पुरुषांचे गैरवर्तनचे अनेक धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. अशा कृत्यांना आळा घालण्यासाठी अनेक कठोर कायदे करण्यात आले पण अजूनही नराधम वेठणीस येतं नाही आहेत. त्यामुळे अशा नराधमांपासून तरुणींने स्वत:ची सुरक्षा करण्यासाठी त्यांना कराटे आणि बचावासाठी प्रशिक्षण देण्यात येतं आहे. प्रत्येक मुलीला आपला बचाव करता येणं किती गरजेचं आहे, हे दाखवणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

आपल्या आजूबाजूला महिला, तरुणींवर रोज अत्याचार होत असतात अशातच प्रत्येकवेळी याला विरोध करण्यासाठी शारिरीक बळच म्हत्त्वाचं असतं असं नाही तर कधी कधी आपण दाखवलेलं प्रसंगावधान, हुशारीही कामी येते. असंच एक प्रकरण सध्या समोर आलं आहे, यामध्ये एका एक व्यक्ती मुंबई पोलीस आहे असं सांगून रिक्षामध्ये तरुणीला धमकावत होता. तिला तुरूंगात टाकण्याची धमकी देत होता. पण तरुणीनं हुशारी दाखवत पाहा त्याचा कसा केला सामना, शेवटी त्यानंच पळ काढला. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून व्हिडीओ पाहून तुम्हीही तरुणीचं कौतुक कराल.

Two girls fighting at collage over a guy shocking video viral on social media
प्रेमासाठी काय पण! एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींचा झिंज्या उपटत तुफान राडा; VIDEO पाहून व्हाल हैराण
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
rape college student in Odisha
Rape On Girl : महाविद्यालयीन तरुणीवर बलात्कार, कॅफेतला व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेलिंग, सहा नराधम अटकेत
minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
Hyderabad Airport Bomb Threat
‘बॉम्ब’चा टोमणा मुलीला महागात पाडला, विमानतळावर उडाली खळबळ; मेटल डिटेक्टरच्या आवाजामुळे गोंधळात भर
stepfather rape daughter
मुंबई: अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या, मानखुर्दमधील धक्कादायक घटना
Young Girl Performs Lavani Dance
गौतमी पाटील तरुणीसमोर फेल! सादर केली सुरेख लावणी, VIDEO होतोय व्हायरल
Father daughter kanyadan emotional video goes viral father daughter bonding video
“हा क्षण का असतो मुलींच्या आयुष्यात?” लग्न ठरलेल्या प्रत्येक मुलीनं आणि तिच्या वडिलांनी पाहावा असा VIDEO

नेमकं काय घडलं ?

एक तरुणी ऑटो रिक्षानं प्रवास करत असताना एका तरुण रिक्षामध्ये बसला आणि मुंबई पोलिसांचं नाव सांगून तिची फसवणूक करण्याचा प्रयत्न करू लागला. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ही तरुणी अंधेरी येथील एमआयडीसी सेंट्रल रोडवर असल्याचं सांगत आहे. त्यानंतर व्हिडीओ सुरु असतानाच हा व्यक्ती तिला धमकावू लागला. तसंच रिक्षा पवई येथील पोलीस स्टेशनमध्ये नेण्यास सांगू लागला.अर्थात तरुणीनं पवईला येणास नकार दिला आणि ती ही संपूर्ण घटना आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करू लागली. दरम्यान त्या फेक पोलीसानं तिला मोबाईल खेचून घेण्याचा प्रयत्न देखील केला. पण तरुणी काही ऐकली मग शेवटी तो रिक्षामधून खाली उतरला. अशा परिस्थितीत न घाबरता योग्य निर्णय घेतल्यानं तरुणीचं सर्वत्र कौतुक होत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> महाकाय अजगराने निलगायीला जिवंत गिळलं; गावकऱ्यांनी पोट दाबून पिल्लू काढलं बाहेर, VIDEO पाहून तुम्हीच सांगा हे कितपत योग्य

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “धाडसी आणि हुशार मुलगी..त्याच्याशी शाब्दिक वाद घालण्याऐवजी, तिने धाडस दाखवत त्याच्याविरोधात आजाव उठवला.”