Shocking video: आपल्या दिवसाची सुरुवात सकाळी उठल्यावर एक कप चहा आणि त्याबरोबर बिस्किटे, असा नाश्ता केल्याशिवाय होत नाही. कारण- उपाशीपोटी चहा प्यायल्याने अॅसिडिटी होण्याची शक्यता असते, असे तुम्हाला लहानपणापासून सांगितले जाते. म्हणूनच आपल्याला चहासोबत काही प्रमाणात बिस्किटे खाण्याचीही सवय लागलेली असते. बरेच लोक चहा किंवा कॉफीसोबत अनेकदा बिस्किटे खातात, फक्त सकाळीच नाही, तर दिवसभरातही बिस्किटे खाल्ली जातात. पण, आता समोर आलेली घटना ऐकून तुम्हीही बिस्कीट खाताना किंवा तुमच्या मुलांना देताना १०० वेळा विचार कराल. याचा एक व्हिडीओही समोर आला आहे, हा व्हिडीओ पाहून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल.

तेलंगणातील कामरेड्डी गावात ब्रिटानिया बोरबॉन बिस्किटाच्या आत लोखंडी पातळ तार सापडली. त्या व्यक्तीने या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ बनवला आणि तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. बिस्किटामध्ये एक पातळ तार अडकल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्या व्यक्तीने असा दावा केला की, तो त्याच्या मुलांसाठी बिस्किटांचा पुडा घेऊन आला होता आणि मुले बिस्किटे खात असताना एका बिस्किटामध्ये ही तार सापडली. ही घटना कामारेड्डी जिल्ह्यातील देवुनिपल्ली गावात घडली असून, व्हायरल व्हिडीओमधील व्यक्तीचे नाव हनुमान रेड्डी, असे आहे. त्या व्यक्तीने व्हिडीओमधून असा दावा केला आहे की, त्याने स्थानिक दुकानातून ब्रिटानिया कंपनीच्या बोरबॉन बिस्किटांचा पुडा विकत घेतला होता आणि मुले बिस्किटे खाताना एका बिस्किटात काहीतरी दिसले. त्यानंतर त्यांनी नीट पाहिले असता, बिस्किटामध्ये एक बारीक लोखंडी तार असल्याचे लक्षात आले. बिस्किटे आणि चॉकलेट यांसारखी उत्पादने मुले मोठ्या प्रमाणात खातात आणि या उत्पादनांमध्ये अन्नसुरक्षेची काळजी घेतली जात नाहीये ही गंभीर बाब आहे.

Little girl Happiness to burst the bubble wrap
VIRAL VIDEO : ‘बबल रॅप म्हणजे प्रेम!’ चिमुकलीचा उत्साह पाहून नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स; म्हणाले, ‘आम्हीसुद्धा लहानपणी…’
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Boy Spoils Sister's Rangoli Caught on CCTV
संधी साधली अन् बहिणीने काढलेली रांगोळी खराब केली, पण अशी झाली पोलखोल, VIDEO एकदा पाहाच
Mom delivers baby by herself while riding in the car to the hospital Shocking video
चमत्कारावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; कारमध्ये महिलेला प्रसूती कळा सुरु झाल्या अन् पुढे जे घडलं त्यावर विश्वास बसणार नाही
viral video of woman stole a bench outside the building shocking video goes viral on social media
VIDEO: अशा महिलांचं करायचं तरी काय? भरदिवसा महिलेनं काय चोरलं पाहून हसावं की रडावं? हेच समजणार नाही
Shocking viral video of a person broke his neck during a massage at a salon watch video
PHOTO: तुम्हीही सलूनमध्ये ‘फ्री हेड मसाज अन् मान मोडून घेताय? या तरुणाबरोबर जे घडलं ते पाहून पायाखालची जमीन सरकेल
Little Boy Viral Video
“तू मोठा झाल्यावर किती बायका करणार?” चिमुकल्यानं दिलं भन्नाट उत्तर; ऐकून तुम्हीही पोट धरुन हसाल; VIDEO एकदा पाहाच

हनुमान रेड्डी यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून, पालकांना त्यांची मुले पॅकबंद अन्न खाताना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. पालकांनी मुलांना खाऊ देण्यापूर्वी अन्नपदार्थ काळजीपूर्वक तपासावेत, असा इशारा दिला आहे. नामांकित कंपन्यांच्या खाद्यपदार्थांमध्येही अनेक कीटक आढळून आल्याच्या अनेक घटना अलीकडच्या काळात समोर आल्या आहेत. त्यामुळे आता पालकांचीही चिंता वाढली आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> रात्रीच्या अंधारात कपलच्या बाईकसमोर आला सिंह; त्यानंतर कपलने केलं ते योग्य केलं का? पाहा थरारक VIDEO

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @TeluguScribe नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी या प्रकरणी कठोर कारवाईसह उत्पादनांची गुणवत्ता तपासण्याची मागणी करीत आहेत.