Shocking video: सोशल मीडियावर नेहमीच नवनवीन व्हिडिओज व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी लोक वाटेल ते करू पाहतात. यावर शेअर केलेले व्हिडिओ कधी आपल्याला पोट शारून हसवतात तर काही व्हिडिओ अक्षरशः आश्चर्याचा धक्का देऊन जातात. सध्या असाच एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये महिला शिक्षिकांमध्ये आधी वाद आणि नंतर थेट मारामारी झाल्याचे दिसून येत आहे. शाळा म्हणजे ज्ञानाचं मंदिर आणि इथले शिक्षक विद्यार्थी आणि समाज घडवत असतात. घरात आईवडील तर शाळेत शिक्षक मुलांवर संस्कार करत असतात. पण याच ज्ञानाच्या मंदिरात शिक्षिकांनीच विद्यार्थ्यांसमोर धक्कादायक कृत्य केलं आहे. एका शाळेतील शिक्षकांनी आपापसात हाणामारी केल्याची घटना घडली आहे. त्याचा व्हिडीओ देखील आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ही घटना आग्रातील एका प्राथमिक शाळेत घडून आली. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन्ही महिला शिक्षिका अक्षरशः लाठ्यांनी एकमेकींना मारत आहेत आणि आपसात भांडत आहेत. हा व्हिडिओ शाळेच्या आवारातून समोर आला आहे, जिथे मुले देखील उपस्थित होती. तरीही या शिक्षिकांनी कसंलही भानन ठेवता अक्षरश: एकमेकिंचे कपडे फाडले. व्हिडिओमध्ये हे देखील दिसून येते की एक तरुण ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात रेकॉर्ड करत आहे, तर इतर लोक महिला शिक्षकांना वेगळे करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र त्यांचा हा प्रयत्न अयशस्वी होतो आणि शिक्षिकांची हाणामारी शेवटपर्यंत सुरुच असल्याचं दिसत आहे.हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून नेटकऱ्यांनीही संताप व्यक्त केला आहे.

एकीकडे मुलांचे शिक्षण आणि संस्कारांची जबाबदारी शाळांवर असताना काही महिला शिक्षिका आपापसात कसे भांडत आहेत हे या घटनेने दाखवून दिले. अशा घटनांमुळे शिक्षणाचे वातावरण खराब होऊन समाजात चुकीचा संदेश जातो. महिला शिक्षकांमध्ये हा वाद कशामुळे झाला हे सध्या तरी स्पष्ट झालेले नाही.

पाहा व्हिडीओ

https://twitter.com/janabkhan08/status/1897979358871986444

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @janabkhan08 नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी तर या शिक्षकांना नोकरीवरुन काढून टाकण्याची मागणी केली आहे. दुसऱ्या युजरने प्रतिक्रिया देताना, शिक्षकच जर असे वागले तर मुलांवर काय संस्कार होणार असा सवाल केला आहे.