Shocking video: आले मसाल्यामधील महत्वाचा घटक. सर्दी, खोकल्यावरील औषध. आल्यामध्ये अनेक पोषक तत्व असून ते आरोग्य वर्धक आहे. बायोएक्टिव युक्त आले असते. आल्याचे गुणधर्म आरोग्याला अधिक उपयुक्त आहेत.आल्याचा वापर चहापासून भाज्यांपर्यंत सगळ्याच प्रकारच्या पदार्थांमध्ये केला जातो. आयुर्वेदिक औषधांमध्येही आल्याच्या वापर महत्त्वाचा मानला जातो. चहा, भाज्या, कढी आणि वरणामध्ये मोठ्या प्रमाणात आल्याचा समावेश केला जातो. आले फक्त पदार्थांची चवच वाढवत नाही, तर ते आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर ठरते. मात्र सध्या समोर आलेला व्हिडीओ पाहून तुम्हीही आता आलं खाण्याआधी नक्की विचार कराल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आलं लसणाची पेस्ट म्हणजे प्रत्येक पदार्थाची चव वाढविण्यासाठीचा आवश्यक आणि महत्वाचा जिन्नस होय. आलं, लसूण न वापरता जेवण करणे याची कल्पनाच आपण करु शकत नाही. झणझणीत, रस्सेदार ग्रेव्ही करायच्या म्हटल्या की त्यात आलं – लसूण पाहिजेच. आपल्यापैकी बऱ्याच गृहिणींना जेवणात आलं – लसणाची पेस्ट वापरण्याची सवय असते. एखाद्या दिवशी आलं – लसणाची पेस्ट जेवणात नसेल तर जेवणाला पाहिजे तशी चवच येत नाही. तसेच हिवाळ्यात जेवणाबरोबरच चहामध्येही एखादा आल्याचा तुकडा टाकला जातो. मात्र सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये एका गृहिणीने दावा केला आहे की, तिला विकत आणलेल्या आल्याच्या तुकड्यामध्ये आळ्या आढळल्या आहेत.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ही महिला सांगत आहे की, तिने बाजारातून आले विकत घेतले, त्यावेळी ते वरुन चांगले दिसले. मात्र जेव्हा तिने त्याचे दोन तुकडे केले तेव्हा तिला आतमध्ये आळ्या आढळल्या. त्यामुळे आलं वापरताना नीट तुकडे करुन तपासून मगच जेवणात वापरा. बाजारात अशाप्रकारे हे आलं आपण पाहिलं तर अंदाजही येणार नाही की अशाप्रकारच्या आळ्या या आल्यामध्ये असू शकतात.बाजारात आधीच मोठ्या प्रमाणावर आपली फसवणूक होत असते. भेसळयुक्त पदार्थ, प्रक्रिया केलेले पदार्थ खाण्याशिवाय आता आपल्याला पर्याय नाही. कारण- आता सर्वच पदार्थांमध्ये भेसळ केली जाते. त्यामुळेच हल्ली आजारी पडण्याचं प्रमाण वाढलं आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> महिलांनो तुम्हीही बाजारातून संत्री विकत घेताय का? थांबा! ‘हा’ VIDEO पाहून संत्री घेताना आता १०० वेळा विचार कराल

सोशल मीडियावर हा व्हिडीओ shiviyaduvanshi1 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shocking video found algae in ginger unhygienic shocking video goes viral srk