Shocking video: भाजी-चपाती-वरण-भात असा बहुतांश भारतीयांचा रोजचा आहार असतो. भाजी आणि वरण बनवताना त्यात आलं लसणाची पेस्ट वापरली जाते. यामुळे त्याला आणखी छान चव येते. मात्र रोज थोडी थोडी आलं लसूण पेस्ट बनवणं खूप कंटाळवाणं काम असतं. म्हणूनच काही महिला विकतची आलं लसूण पेस्ट आणून जेवणात ती वापरतात.आलं आणि लसूण दोन्ही पदार्थांचा भारतीय जेवणामध्ये भरपूर प्रमाणात वापर होतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दोन्ही पदार्थांमध्ये शरीराला आवश्यक असणारे पोषक गुणधर्म अधिक प्रमाणात आढळतात. आलं आणि लसूण या दोन्ही पदार्थात अँटीइन्फ्लेमेटरी तत्व असतात. यामुळे हृदयरोगी व्यक्तींनाही फायदा मिळतो. याशिवाय आलं-लसणात अँटीकॅन्सर गुण असतात. प्रतिकारशक्ती वाढण्याची योग्य क्षमता यामध्ये असते. हीच पेस्ट अनेकजण घरात तयार न करता बाहेरून तयार स्वरुपाची घेऊन येतात. तुम्हीही विकतची आले लसूण पेस्ट वापरत असाल तर हा व्हिडीओ पाहाच. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल.
लसणाची पेस्ट म्हणजे प्रत्येक पदार्थाची चव वाढविण्यासाठीचा आवश्यक आणि महत्वाचा जिन्नस होय. आलं, लसूण न वापरता जेवण करणे याची कल्पनाच आपण करु शकत नाही. झणझणीत, रस्सेदार ग्रेव्ही करायच्या म्हटल्या की त्यात आलं – लसूण पाहिजेच. आपल्यापैकी बऱ्याच गृहिणींना जेवणात आलं – लसणाची पेस्ट वापरण्याची सवय असते. एखाद्या दिवशी आलं – लसणाची पेस्ट जेवणात नसेल तर जेवणाला पाहिजे तशी चवच येत नाही. परंतु अनेक वेळा धावपळीत आले लसूण सोलून त्याची पेस्ट बनवायला वेळ नसतो. त्यामुळे महिला विकतची पेस्ट आणतात आणि वापरतात. पण तुम्ही कधी विचार केलाय का की ही पेस्ट कशी बनवली जाते. सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये एका गृहिणीने दावा केला आहे की, तिला दुकानातून आणलेल्या आलं लसूण पेस्टच्या पाकिटामध्ये प्लॅस्टिकचे कण आढळले. त्यानंतर या महिलेने एका कुकरमध्ये फक्त आलं लसूण पेस्ट टाकली आणि गॅसवर ठेवली असता ही पेस्ट संपूर्णपणे कूकरला चिकटली आणि जळाली. यावरुन सिद्ध झालं की या आलं लसूण पेस्टमध्ये खरोखरचं प्लॅस्टिकचे कण होते.
मानवी शरीरात जर आहारातून अशाप्रकारे प्लास्टिक जात असेल तर त्यांचा मानवी शरीरावर गंभीर परिणाम होवू शकतो.
पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ सोशल मीडियावर shubhangimankar60 नावाच्या इनस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर नेटकरी संतापजनक प्रतिक्रिया देत आहेत.