Shocking video: खाद्यपदार्थांमध्ये भेसळ किंवा अस्वच्छता असल्याच्या बातम्या नेहमीच येत असतात. मात्र आता हिंगोलीमधून एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. हिंगोलीत हातगाड्यावर फळांची विक्री करणाऱ्या एका फळ विक्रेत्याने अतिशय किळसवाणं कृत्य केल्याचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही पायाखालची जमीन सरकले. या फळ विक्रेत्यानं भर रस्त्यात थांबून कॅरीबॅगमध्ये लघुशंका करत विकृतीचं दर्शन घडवलं होतं. या फळविक्रेत्याचा एका नागरिकाने व्हिडिओ काढत सोशल मीडियावर व्हायरल केला होता. त्यानंतर हिंगोली शहरात नागरिकांनी संताप व्यक्त केला होता.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, तो थेट कॅरी बॅगमध्ये लघवी करताना दिसतो. व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी विक्रेत्याचा शोध सुरू केला आहे. नंतर फेरीवाल्यानं बॅग रस्त्याच्या कडेला फेकून दिली आणि हातही धुतले नाहीत. या घृणास्पद कृत्याबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. हा व्हिडिओ हिंगोली शहरातील मंगळवार बाजार परिसरातील असल्याचे सांगितले जात आहे. एका व्यक्तीने ही घटना त्याच्या मोबाईलमध्ये कैद केली आहे. या विक्रेत्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे. हिंगोली पोलिसांनी या घटनेची दखल घेतली आहे आणि या प्रकरणाचा तपास करत आहेत. हिंगोली पोलिसांचा सायबर सेल देखील व्हिडिओची पुष्टी करत आहे.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता हिंगोली शहर पोलिसांनी मंगळवार बाजार परिसरात रस्त्यावर लघुशंका करणाऱ्या या फळ विक्रेत्याला ताब्यात घेत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.हिंगोली पोलीस या फळ विक्रेत्याची कसून चौकशी देखील करत आहेत. त्याने रस्त्यावर कॅरीबॅगमध्ये लघुशंका का केली? त्याचा हेतू काय होता? याचा देखील तपास पोलीस आता करत आहेत.
पाहा व्हिडीओ
ही घटना पहिल्यांदाच घडत नाहीये. २०२४ मध्ये, ठाणे पोलिसांनी डोंबिवली जिल्ह्यातील एका फळ विक्रेत्याला पिशवीत लघवी केल्यानंतर हात न धुता फळे विकल्याच्या आरोपाखाली अटक केली होती.
सार्वजनिक शौचालयांचा अभाव
जवळपासच्या भागात सार्वजनिक शौचालयांची अनुपस्थिती नेहमीच विक्रेते आणि दुकान मालकांसाठी एक समस्या राहिली आहे. २०१९ मध्ये, मुंबईतील एका विक्रेत्याने न्यायालयात धाव घेतली होती आणि दावा केला होता की त्याला गृहनिर्माण सोसायटीच्या शौचालयाचा वापर करण्याचा अधिकार आहे. न्यायालयाने सोसायटीच्या परवानगीशिवाय प्रवेश देण्यास नकार दिला असला तरी, जवळपासच्या सार्वजनिक शौचालयांच्या अनुपलब्धतेबद्दल त्याच्या चिंता मान्य केल्या होत्या.