Shocking video: सध्या लग्नाचा सीजन सुरु आहे. सोशल मीडियावरही या काळात लग्नाचे अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओज बऱ्याचदा लग्नातील काही मजेदार गोष्टी किंवा अपघातांचे दृश्य दाखवत असतात. तुम्हीही जर सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असाल तर तुम्ही लग्नाचे असे अनेक व्हिडिओज पाहिले असतील. आजकाल लग्न म्हणजे विधी कमी आणि सोहळा जास्त झाला आहे. प्रत्येक छोट्या विधींचं सोहळ्यात रुपांतर झालं आहे. अगदी मेहंदीपासून ते रिसेप्शनपर्यंत ग्रँड वेडिंग झालं पाहिजे असा अट्टाहास असतो. त्यासाठी सर्वतोपरि प्रयत्न केले जातात. त्यातच कोणतंही विघ्न येऊ नये म्हणून थोडी भीती देखील असते. मात्र हीच भीती एका कुटुंबाची खरी ठरली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका लग्नसमारंभात वधू वर हे लग्नमंडपात एन्ट्री घेताना दिसत आहेत,ज्यात समोर कॅमेरामॅन त्यांची ही एन्ट्री रेकॉर्डिंग करत असतो.अश्यातच वधू- वर स्टेजच्या दिशेने जात असताना वरातीमधील काही माणसं स्पार्कल गनने फटाक्यांची आतिषबाजी करताना दिसताय. पण या दरम्यान नवरदेवाच्या फेट्यावर ठिणगी पडते आणि फेट्याला आग लागते पण सुदैवाने कॅमेरामनची नजर त्याच्यावर पडते. त्यानंतर क्षणाचा विलंब न करता कॅमेरामॅन धावत येतो आणि पुढच्याच क्षणी डोक्यावरील फेटा काढून टाकतो. त्यामुळे मोठी दुर्घटना टळते.

अनेकदा तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या लग्नाला गेले असाल तर तेव्हा वधू-वरांना वेगवेगळ्या पद्धतीने लग्न मंडपात एन्ट्री घेताना पाहिलं असेल. यात गैर काहीच नाही, कारण प्रत्येक वधू-वराचे स्वप्न असते कि त्यांच्या लग्नाची एन्ट्री ही ग्रँड पद्धतीने व्हावी. पण काही वेळा ग्रँड एन्ट्रीच्या नादात अपघात होतात. अन् काही क्षणाचा आनंद आयुष्यभराच्या दुख:त बदलतो.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO:”जेव्हा वडिलांची जागा भाऊ घेतो” अंगाला हळद लागली पण बघायला बाप नाही, वडिलांचा फोटो घेऊन भावानं काय केलं पाहा

“काही क्षणांसाठी आयुष्याचा खेळ करु नका”

सोशल मीडियावर हा व्हिडीओ didwana_rj37__ नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरीही थक्क झाले असून व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय “हल्ली हे भलतंच फॅड आलंय”, तर दुसऱ्या एका युजरने “या व्हिडिओतून धडा घेण्याची गरज आहे” अशी प्रतिक्रिया दिलीय. तर आणखी एकानं “काही क्षणांसाठी आयुष्याचा खेळ करु नका” अशी प्रतिक्रिया दिली आहे.