Shocking video: लग्नात जर सर्वात जास्त मस्ती करणारी जोडी कुणी असेल तर ती आहे मेहुणी आणि भाओजीची जोडी. ते एकमेकांची गंमत करण्याचे अनेक कारणे शोधत असतात. मेहुणी तर नवरदेवाच्या एन्ट्रीपासून ते शूज लपवण्यापर्यंत आपल्या भाओजीला त्रास देत असते. तेच काही भाओजीही काही कमी नसतात. तेही आपल्या मेहुणीला त्रास देण्यासाठी काहीना काही बहाना शोधत असतात. अनेकदा भाओजी आणि मेहुणीतील गमतीदार वादही स्टेजवर बघायला मिळतो.लग्न समारंभीत नेहमीच गमती-जमती चालत राहतात. अनेक नवरी-नवरदेव गंमत करतात. तर काही पाहुणेही त्यांची मजा घेतात. खास करुन नवरदेवाच्या किंवा नवरीच्या कलवऱ्यांची तर लग्नात हमखास चर्चा असते. कधी नवरदेवाचे बूट चोरतात तर कधी नवरदेवासोबत गंमत करतात. असाच एक लग्नातला व्हिडीओ सध्या समोर आला आहे, हा व्हिडीओ पाहून तुम्ही म्हणाल असा नवरा नको रे बाबा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कारण या नवरदेवानं चक्क आपल्या बायकोच्या बहिणीलाच किस करण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान हे सगळं बायको पाहते आणि त्यानंतर काय होतं ते तुम्हीच पाहा.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये नवरा नवरी बसलेले दिसत आहे. स्टेजवर खूप लोक उपस्थित आहेत.यावेळी नवरीची बहिण येते तिला पाहून नवरदेव तिला त्याच्या शेजारी बसण्यास सांगतो. यावेळी मेहुणी सेल्फी काढू लागते. पण पुढच्याच क्षणी त्यांच्यामधील मस्करीमध्ये अचानक नवरदेव महुणीला किस करण्याचा प्रयत्न करतो. जे पाहून वधूलाही आश्चर्याचा धक्का बसतो. नवरदेवानं आपल्या मेहुणीचे चुंबन घेण्याचा प्रयत्न करताच, नवरी लगेचच त्याला जोरदार चापट मारते आणि आपला राग व्यक्त करते. यांनतर मात्र नवरदवाचा चेहरा लाजेने लाल होतो आणि तो लगेच शांत होऊन आपल्या जागेवर बसला. पण यानंतरही नवरीचा राग काही शांत होत नाही आणि ती संतापलेल्या नजरेने त्याच्याकडे बघत राहते. हा सर्व प्रकार पाहून मेव्हणीही यावेळी थक्क झाल्याचे दिसते आणि तिथे एक वेगळीच शांतता पसरते.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर लग्नाचे अनेक मजेदार व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही फनी असतात, जे बघितल्या बघितल्या लोटपोट होऊन हसायला येतं. तर काही व्हिडीओ पाहून आश्चर्यही वाटतं. असे व्हिडीओ यूजर्सना आवडतातही आणि ते शेअर करून त्यावर कमेंट्सही करतात. एका तरुणीनं यावर “बापरे असा नवरा नकोच…” अशी प्रतिक्रिया दिली आहे तर आणखी एकानं ‘हे काय चालले आहे.’ अशी प्रतिक्रिया दिली.