Pune viral video: सोशल मीडियावर रोज काही काही व्हायरल होत असते. अनेकदा असे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात जे पाहून हसू आवरत नाही. तर अनेकदा आश्चर्यचकित करणारे व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. तुम्ही भांडणांचे तर अनेक व्हिडीओ पाहिले असतील. असे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. भांडणांचे तर अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. कधी कधी हे व्हिडीओ इतके मजेशीर असतात की हसून डसून पोटात दुखायला लागते. वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देतात. सध्या जो व्हिडिओ व्हायरल होत आहे तो अगदी वेगळाच आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही डोक्याला हात लावाल. महिलांची अनेक वेगवेगळी भांडणं तुम्ही पाहिली असतील. महिलांना भांडण करायला कारणच लागतं, अशाच पुण्यातील महिलांनी चक्क भर रस्त्यात तुफान हाणामारी केली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणेकर त्यांच्या वैशिष्टपूर्ण तिरकस स्वभावासाठी नेहमी ओळखले जातात.‘तुम्हाला प्रत्येक विषयात स्वत:चे मत नसेल तर येथे प्रवेश नाही’ अशा इशार्‍यापासून ते ‘पगडीखालची खरी बुद्धिमत्ता काय असते हे पाहायचंय?’ असे आव्हान फक्त एकाच शहरात दिले जाऊ शकते, ते म्हणजे पुणे. कमीत कमी शब्दांत समोरच्याचा जास्तीत जास्त अपमान करण्याची कला पुणेकरांनाच साधली आहे, असे म्हणतात. मात्र सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये महिलांनी शा‍ब्दिक नाही तर थेट एकमेकींवर हल्ला केला आहे.

महिलांच्या भांडणाशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर दररोज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओ फक्त बघितलेच जात नाहीत तर ते तितकेच शेअर देखील केले जातात. एक व्हिडिओ सध्या लोकांमध्ये चर्चेत आहे. हा हाणामारीत कोणी कोणाचे कपडे फाडतेय तर कोणी एकमेकांच्या झिंज्या उपटतेय. एवढंच नाहीतर या हाणामारीत काही महिला जखमी सुद्धा झाल्या आहेत.ही घटना पुण्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील इराणी वस्तीत घडली आहे. पोलीस या प्रकरणी चौकशी करत आहेत. पण ही लढाई इतकी घनघोर होती की एक पुरूष आणि एक महिला गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.या दोघांवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तसंच आणखी काही महिलांना सुद्धा किरकोळ दुखापत झाली आहे.

पाहा व्हिडीओ

ही लढाई का आणि कोणत्या कारणासाठी झाली याची माहिती सध्या तरी समोर आलेली नाही. या भांडणाचं पुढे काय झालं, कशासाठी ही भांडणं झाली याबद्दल काहीही माहिती मिळालेली नाही. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक कमेंटच्या माध्यमातून त्यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

हा व्हिडीओ@viralmedia70 या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. यावर काही युजर्सनी प्रतिक्रियाही दिल्या.