Shocking video: रेल्वेने प्रवास करताना प्रवाशांना नेहमीच सावध राहण्याचे आवाहन केले जाते. अनेकवेळा थोड्याशा निष्काळजीपणामुळेही मोठे नुकसान होते. रेल्वेत अनेक टवाळ, चोर, दरोडेखोर लुटण्याच्या इराद्याने येत असतात आणि संधी शोधत असतात. सध्या सोशल मीडियावर एका घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक सतर्क व्हाल. भारतीय रेल्वेच्या प्रवाशांबरोबर अनेकदा काही ना काही आश्चर्यकारक घटना घडत असतात, यात काही क्षणात व्हायरल होतात. अशाच एका चोराचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. या चोराचा चोरी करण्याचा प्रयत्न फसला आणि त्याला प्रवाशांनी रंगेहात पकडलं. हा चोर कसा तावडीत सापडला तुम्हीच पाहा.

चोरी करणं हा गुन्हा आहे अन् जर का तुम्ही चोरी करताना पकडला गेलात तर तुम्हाला मोठी शिक्षा होऊ शकते. मात्र, तरीदेखील काही मंडळी झटपट पैसा कमावण्यासाठी गुन्हेगारीचा रस्ता निवडतात. अशाच एका गुन्हेगाराचा व्हिडीओ समोर आला आहे.

Gujarat gold chain snatchers thieves active in vasai
गुजरातमधील सोनसाखळी चोर वसईत सक्रीय, गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून अटक
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Mokka crime fugitive arrested from Karnatak Pune news
Pune Crime News: मोक्काच्या गुन्ह्यातील फरारीला कर्नाटकातून अटक
demand for ransom of Rs 2 crore case filed against three including Valmik Karad in kej
दोन कोटींच्या खंडणीची मागणी; वाल्मीक कराडांसह तिघांवर केजमध्ये गुन्हा
mp theft viral video
VIDEO : दुकानात चोरी करण्याआधी चोराने घेतले देवाचे आशीर्वाद, नंतर लॉकरमधील पैसे चोरून झाले पसार; घटना CCTV मध्ये कैद
fake police verification certificate, Anti-Terrorism Branch action, fake police verification certificate maker,
सावधान..! बनावट पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट बनवणाऱ्यांवर गुन्हा दाखल; दहशतवाद विरोधी शाखेची कारवाई
villagers rescue accused as well as cop falls into well In sangamner taluka
पुढे आरोपी, मागे पोलीस पाठलागाचा थरार ! आरोपी पाठोपाठ पोलीसही पडला विहिरीत
cyber crimes loksatta news
पुणे : सायबर चोरट्यांच्या जाळ्यात नागरिक; सव्वा कोटींची फसवणूक

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी आहे. लोक उभ्यानं प्रवास करत आहेत. काहींना नीट उभं राहायलाही जागा नाहीये. दरम्यान, दोन चोरांनी याचाच फायदा घेत चोरी करण्याचा प्लॅन केला. यावेळी या दोन तरुणांनी एका महिलेची पर्स चोरण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचा पहिलाच प्रयत्न फसला. त्यांची चोरी पकडली गेली आणि इतर प्रवाशांनी त्यांना रंगेहात पकडलं. यानंतर त्यांची अशी अवस्था झाली की तुम्ही विचारही नाही करू शकणार. इतर प्रवाशांनी या दोन तरुणांना अक्षरश: लाथा- बुक्क्यांनी चोप दिला. या व्हिडीओमध्ये दिसत आहे, दोन तरुणांना प्रवासी बेदम मारत आहेत. काहींनी तर त्यांची कॉलर पकडून त्यांचा गळाही आवळला आहे. हे दोन तरुण आपली सुटका करून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, प्रवासी इतके संतापले आहेत की या चोरांना सोडतच नाहीये. ट्रेनमध्ये वारंवार अशा चोऱ्यांचे प्रकार पाहायला मिळतात, अशावेळी चोरी पकडली गेली तरी हे चोर तेवढ्यापुरती माफी मागून पुढच्या वेळी पुन्हा तीच चूक करतात.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “तू ये साजना…” आजीबाईंनी गुडघ्यावर बसून आजोबांना केलं भन्नाट प्रपोज; VIDEO पाहून पोट धरुन हसाल

हा व्हिडीओ @gharkekalesh नावाच्या युजरने एक्सवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत दीड लाख लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर अनेक युजर्सनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. एका युजरने लिहिले की, धक्कादायक व्हिडीओ. दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, “अशा लोकांपासून सावध राहण्याची गरज आहे.” याशिवाय इतरही अनेक युजर्सनी या पोस्टवर कमेंट केल्या आहेत.

Story img Loader