Viral video: लहान मुलींपासून वयस्कर महिलांची सुरक्षा ही जगभरातील मोठी चिंता आहे. देश कुठलाही असो तरुणी असो वा विवाहीत महिला यांच्यासोबत पुरुषांचे गैरवर्तनाचे अनेक धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. अशा कृत्यांना आळा घालण्यासाठी अनेक कठोर कायदे करण्यात आले; पण अजूनही नराधम वठणीवर येत नाहीत. देशात महिलांसोबत होणाऱ्या छेडछाड, बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. सोशल मीडियावर आपल्याला नेहमीच असे काही व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात, जे धक्कादायक असतात. सध्या एक असाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, यामध्ये एका तरुणानं बाईकवरुन येत एका तरुणीला नको त्या ठिकाणी अश्लील स्पर्श केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
रस्त्याने चालताना असो वा सार्वजनिक वाहनांमध्ये प्रवास करताना इथं मुलींची छेडछाड करणाऱ्यांची कमी नाही. बलात्कार, अत्याचार, छळ याचं प्रमाण शंभर टक्के कमी झालेलं नाहीये. आजही मुलींना या सगळ्याला सामोरं जावं लागतं. काही नराधमांमुळे सगळ्यांचं नाव खराब होतं. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दुपारचा मोकळा रस्ता दिसत आहे. यावेळी तिथून ४, ५ महिला जात आहेत, तेव्हा एक तरुण तिथून बाईकवर येताना दिसतो. पुढे तो पुन्हा मागे येतो आणि महिलेला अश्लील स्पर्श करत निघून जातो.. यावेळी ती महिला अजिबात न घाबरता आरडाओरड करत त्याला ओरडते, मात्र तो बाईकवर पुढे निघून जातो. या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, हा तरुण कशा प्रकारे महिलेला बिनधास्तपणे विचित्र पद्धतीने हात लावून गेला.
दिवसेंदिवस भररस्त्यात मुलींची छेड काढण्याच्या प्रसंगात वाढ होत आहे. दिवसाढवळ्या मुलींची छेड काढली जाते. मात्र, फार कमी वेळा अशा नराधमांना शिक्षा दिली जाते. बऱ्याच वेळा मुलींची छेड काढून असे रोमिओ पळूनही जातात. मात्र यावेळी या नराधमाला पोलिसांनी पकडलं आणि भररस्त्यात मारत मारत त्याची धिंड काढली. पोलीस त्याला मारत मारत घेऊन जात आहेत. आजूबाजूला गर्दी जमल्याचेही व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
पाहा व्हिडीओ
दररोज सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडोओ व्हायरल होत असतात. अनेक वेळा हे व्हिडीओ पाहून आश्चर्य वाटते. अनेक लोकांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. नेटकरीही तरुणाच्या या वागणुकीवर संताप व्यक्त करत आहेत. या माणसाला अशीच शिक्षा मिळायला हवंय, असं लिहिलंय. तर कुणी अशा नराधमांना ठेचून काढा, असं म्हटलंय.