Shocking video: कुठलीही चोरी करण्यापूर्वी चोर प्रचंड अभ्यास करतात असं म्हटलं जातं. सर्वात आधी ते वस्तूचं बारीक निरिक्षण करतात. ती वस्तू कशी चोरता येईल या बद्दत नियोजन आखतात. अन् चोरी फसलीच तर काय करायचं याबाबतही प्लान बी रेडी असतो. चोरांना इतकी तयारी ही करावीच लागते. कारण चोरी करणं हा गुन्हा आहे. अन् जर तुम्ही पकडला गेलात तर तुमची काही खैर नाही. पोलीस नंतर मारतात आधी पब्लिकच चांगली धुलाई करते. अन् शेवटी तुरुंगाची हवा खावी लागते हे तर वेगळंच. मात्र सध्या समोर आलेला चोरीचा व्हिडीओ पाहून म्हणाल या चोरानं अभ्यास नाही तर चोरी कशी करायची यावर पिएचडीच केली असावी. कारण भर दिवसा दुकानदार दुकानातच पुजा करत असताना या चोरानं अवघ्या काही सेकंदामध्ये त्यानं मोबाईलवर डल्ला मारला आहे. चोरीची ही पद्धत पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, सकाळी दुकानदार दुकानामध्ये पुजा करत आहे. यावेळी एक व्यक्ती दुकानाबाहेर फेऱ्या मारताना दिसत आहे. यावेळी तो संपूर्ण दुकानाचं निरिक्षण करत चोरी करण्यासाठी अंदाज घेत आहे. जसा दुकानदार पुजा करण्यासाठी वळतो तसा हा व्यक्ती दुकानात येतो आणि अवघ्या सेंकदात फोन घेऊन सहजपणे निघून जातो. लूटमारीच्या, चोरीच्या गुन्ह्यांची संख्या वाढतच चालली आहे. चोर चोरी करण्यासाठी नवनवीन आयडीया घेऊन येत असतात. कितीही चलाख चोर असुदेत पोलीस चोराला शोधून काढतातच. तरीही चोऱ्यांचे प्रमाण काही कमी होत नाही. अशातच एका तरुणाने दुकानदारासमोरच अशी चोरी केली आहे की हा व्हिडीओ पाहून आणि चोरीची पद्धत पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.
विशेष म्हणजे चोर चोरी करुन गेला तरीही दुकान मालकाला अजिबात अंदाज आला नाही की दुकानातून काही चोरीला गेलं आहे. तो तसाच पुजा करण्यात व्यस्थ आहे.
पाहा व्हिडीओ
े
हेही वाचा >> प्रवाशांनो सावधान! दादर स्टेशनवर चोरांचा सुळसुळाट; रंगेहात पकडताच ब्लेड काढलं अन्…धक्कादायक VIDEO पाहाच
हा व्हिडीओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. एकाने म्हंटलं आहे की, “बापरे काय चोर आहे” दुसरा म्हणतो “चोरांना वाटले असावे की सीसीटीव्ही नसतील.” आणखी एका युजरने “हे अरे आपल्या स्वत:च्या दुकानात लक्ष नाही असं कसं ?”