Viral video: तुमच्या घरात जर लहान मूल असेल, तर ही बातमी तुम्ही आवर्जून वाचली पाहिजे. लोणावळ्यात एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची घटना ३० जून रोजी घडली होती. ही घटना ताजी असतानाच ताम्हिणी घाटात एक तरुण वाहून गेल्याची घटना घडली. दरम्यान, अशाच एका घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये एक लहान मुलगी समुद्राच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून जाताना दिसत आहे. या घटनेचा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहिल्यावर थरकाप उडत आहे. हा समुद्रातील भयावह व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही समुद्रात असं धाडस करताना १० वेळा विचार कराल.

समुद्र किनाऱ्यावरील थरारक घटना

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
jaipur tanker blast injured people condition Bandages all over the body but viral video real or fake read fact check
जयपूरमधील स्फोटात होरपळलेल्या लोकांचे हाल? संपूर्ण शरीरावर बँडेज, धड चालताही येईना, पण या व्हायरल व्हिडीओची खरी बाजू पाहा
Heart touching video of a kid crying and asking mother to come early from work emotional video viral on social media
रडत रडत तिच्याजवळ गेला अन्…, कामावर जाणाऱ्या आईला मुलाची विनवणी, VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील
Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
Having trouble starting your car in winter
हिवाळ्यात गाडी सुरू करण्यात अडचणी येतायत? ‘या’ गोष्टी एकदा तपासून पाहा
tiger seen sitting on elephant shocking video viral
भयंकर घटना! वाघाला पकडून हत्तीवर बांधले अन् पुढे केलं असं काही की…, धक्कादायक VIDEO पाहून लोकांचा राग अनावर
Accident
Accident News : सुरक्षेसाठी बसवलेली एअरबॅग ठरली जिवघेणी! वाशी येथे अपघातात ६ वर्षीय मुलाचा मृत्यू

पावसाळ्यात तरुण-तरुणी भिजण्यासाठी आणि मजामस्ती करत निसर्गाचा आनंद घेण्यासाठी धबधबे, धरण, नदीवर पोहोचतात. काही जण समुद्रकिनारी जातात, बोटिंगचा आनंद घेतात. अशावेळी सांगूनही पर्यटक ऐकत नाहीत. काही वेळेला समुद्राला भरती आलेली असते, तरीही पर्यटक नसतं धाडस करतात आणि हेच धाडस त्यांचा अंगाशी येतं. असाच एक समुद्रातील व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये एक लहान मुलगी वाहून जाताना तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी अवघ्या काही सेकंदांत घेतलेल्या निर्णयामुळे ही चिमुकली बचावली आहे. हा थरारक व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल.

बघता बघता वाहून गेली चिमुकली

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, समुद्र दिसत असून, समुद्रात मोठमोठ्या लाटाही उसळताना दिसत आहेत. यावेळी काही पर्यटक समुद्राच्या किनारी भिजण्याचा आनंद घेत आहेत. मात्र, यावेळी समुद्र खवळलेला दिसत असून मोठ्या लाटा उसळत आहेत. अशावेळी एखादा मोठा व्यक्तीही या पाण्याच्या प्रवाहात वाहून जाईल, इतक्या मोठ्या या लाटा आहेत. तरीही काही लहान मुले या ठिकाणी दिसत आहेत. अशीच एक लहान मुलगी समुद्रकिनारी याच लाटांचा आनंद घेत असताना मोठी लाट येते आणि तिला समुद्रात घेऊन जाते. सगळ्यांच्या डोळ्यासमोर ही लहान मुलगी लाटेबरोबर वाहून जाताना दिसत आहे. यावेळी ती मुलगी घाबरलेली असून हात वर करून ओरडतानाही दिसत आहे. यावेळी एक व्यक्ती धाडस दाखवत या मुलीला वाचवण्यासाठी पुढे जातो, मात्र लाटा एवढ्या मोठ्या आहेत की त्या व्यक्तीलाही पाण्यात नीट उभं राहता येत नाहीये. यावेळी आणखी एक व्यक्ती येते आणि तीही या पाण्यात पडते. मात्र, हे दोघे या मुलीचा जीव वाचवतात आणि तिला बाहेर घेऊन येतात.

पाहा व्हिडीओ

https://www.instagram.com/reel/C9NKRwAv9kY/?igsh=MXVjM280aW45a3J2Mg==

हेही वाचा >> Hit and Run: पुन्हा हिट अँड रन; नवी मुंबईत इनोव्हाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, थरारक CCTV VIDEO समोर

या दोघांनी दाखवलेल्या धाडसामुळे या चमुकलीचा जीव थोडक्यात बचावला अन्यथा मोठा अपघात झाला असता. अशा प्रकारे पाण्याशी खेळणं, रिस्क घेणं किती महागात पडू शकतं हे हा व्हिडीओ पाहून लक्षात येत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर english_knowledge नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या व्हिडीओप्रमाणेच अनेक व्हिडीओ सोशल मीडियामुळे अनेकदा समोर येतात.

Story img Loader