Shocking video: चिक्की हा पदार्थ सगळ्यांचं खूप आवडतो. बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या चिक्की उपलब्ध आहेत. चिक्की खाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. बाजारात शेंगदाणा चिक्की, काजू बदामाची चिक्की, प्रोटीन बार चिक्की इत्यादी अनेक प्रकारच्या चिक्की उपलब्ध आहेत. अनेकदा आपण प्रवास करताना किंवा नातेवाईकांकडे जाताना, घरातील लहानांसाठी खाऊ म्हणून चिक्की घेऊन जातो. मात्र ही बाजारात मिळणारी चिक्की किती पौष्टिक असते तसेच ती कशी कुठे बली जाते हे आपल्याला माहिती नसतं. मात्र सध्या समोर आलेला व्हिडीओ पाहून तुम्हीही यापुढे चिक्की विकत घेताना शंभर वेळा विचार कराल. हा व्हिडीओ पाहन तर तुम्हालाही धक्तका बसेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, कारखान्यात चिक्की बनवण्याचं काम सुरु आहे. मात्र तो परिसर अतिशय अस्वच्छ आणि घाणेरडा दिसत आहे. तसेच तिथले कामगारही हातात काहीही न घालता चिक्की बनवत आहे, यावेळी त्यांचा अवतार बघूनच तुम्हाला अंदाज येईल की कोणत्याही प्रकारची स्वच्छतेची काळजी न घेता हे सगळं सुरु आहे. हेच आपण खूप चवीनं बाजारातून विकत घेऊन खातो.  हा एक प्रकारे लोकांच्या जीवाशी खेळच आहे. हे खाल्ल्यावर नक्कीच आरोग्यावर त्याचे वाईट परिणाम होतील. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नागरिक प्रचंड संतापले आहेत. तुम्हालाही चिक्की खायला आवडत असेल तर हा व्हिडीओ पाहून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल.

खाण्यापूर्वी १०० वेळा विचार कराल

बाजारात आधीच मोठ्या प्रमाणावर आपली फसवणूक होत असते. भेसळयुक्त पदार्थ, प्रक्रिया केलेले पदार्थ खाण्याशिवाय आता आपल्याला पर्याय नाही. कारण आता सर्वच पदार्थांमध्ये भेसळ केली जाते, त्यामुळेच हल्ली आजारी पडण्याचं प्रमाण वाढलं आहे.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ bano_fitindia नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी प्रचंड संतापले असून कारवाईची मागणी करत आहेत. तसेच फॅक्टरी लवकरात लवकर बंद करण्याचीही मागणी होत आहे. एकानं म्हंटलंय, “बापरे जीव घेणार का आता?” तर आणखी एकानं अतिशय चिंताजनक आहे हे अशी प्रतिक्रिया दिली आहे.