Shocking video: शुक्रवारी मध्य म्यानमारमध्ये ७.७ रिश्टर स्केलच्या शक्तिशाली भूकंपात किमान १,६४४ लोकांचा मृत्यू झाला आहे आणि ३,४०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. भूकंपाचे धक्के थायलंड, चीन, भारत, व्हिएतनाम आणि बांगलादेशसह अनेक शेजारील देशांमध्ये जाणवले. या विनाशाच्या दरम्यान, चीनच्या युनानमधील एका रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये भूकंपाने रुग्णालयाला जोरदार हादरवून टाकले तेव्हा नवजात बालकांचे संरक्षण करण्यासाठी दोन प्रसूती वॉर्ड परिचारिका आपला जीव धोक्यात घालत असल्याचे दिसून आले आहे. यावेळी या नर्सच्या एका गोष्टीमुळे ही नवजात बाळं बचावली आहेत. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही त्यांचं कौतुक कराल.
सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात शेअर होणाऱ्या या व्हिडिओमध्ये, भूकंपाचे धक्के जाणवले तेव्हा एका वॉर्डमध्ये बाळांना घेऊन जाणाऱ्या नर्स दिसत आहेत. जोरदार हादऱ्यांमुळे बाळ असलेले पाळणे हलत आहेत.तेव्हा येथील परिचारिकांनी नवजात बालकांना वाचवण्यासाठी खूप संघर्ष केला. . भूकंपाच्या वेळी परिचारिकांनी धाडस दाखवत नवजात बालकांना वाचवल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येते. जेव्हा भूकंप झाला तेव्हा परिचारिकांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी बाहेर पळण्याऐवजी नवजात बालकांना वाचवण्याला प्राधान्य दिले. ती पाळणा हलू नये म्हणून धावत गेली आणि इमारत हादरत असतानाही तिने इनक्यूबेटरला धरून ठेवले.युनानमधील जिंगचेंग रुग्णालयाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. भूकंपाच्या धक्क्यामुळे रुग्णालयाची इमारत हादरली असतानाही ज्या कामगारांनी पाळणे स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला त्यांचे खूप कौतुक केले जात आहे.
भूकंपाची तीव्रता वाढत असताना, पाण्याचे फिल्टर जोरात हादरले आणि जमिनीवर पाणी सांडले. ओल्या जमिनीवरही बाळांना इजा होऊ नये म्हणून परिचारिकांना त्यांचा तोल राखण्यासाठी धडपड करावी लागली. भूकंपाच्या तीव्रतेने जमिनीवरून ओढल्या जाणाऱ्या पहिल्या परिचारिकेने बाळाला घट्ट धरले आणि दुसऱ्या हाताने पाळणे एकमेकांवर आदळू नये म्हणून बाळाला धरले.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @tongbingxue नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्याता आला आहे. हा व्हिडीओ पाहून आता नेटकरी या नर्सच कौतुक करत आहेत.