Viral video: शेवया हा असा खाद्यपदार्थ आहे, जो केवळ विदर्भातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात बनविला जातो. शेवयाला ‘अस्सल पारंपरिक मराठी पदार्थ’ म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही. काहींना तर लहानपापासून याची इतकी सवय झालेली असते की, आमरस केल्यानंतर शेवयाची फर्माइश केल्याशिवाय राहावतच नाही. अशा या शेवया म्हणजे, जणू काही सरगुंड्याचा लहान भाऊच. पाहुणचारात शेवया नसल्या तर रुसणाऱ्यांची संख्या काही कमी नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शेवया हा खास कसदार गव्हाचा पदार्थ. उन्हाळ्यात होणाऱ्या वाळवणोत्सवातलाच हा एक प्रकार. कुरड्या, सांडग्या, धापोडे, सरगुंडे याचप्रमाणे शेवयाही हमखास बनविल्या जातात. पूर्वी शेवया बनविण्यासाठी कुटुंबातील किमान तीन-चार सदस्य कर्तव्यावर असायचे. मात्र, सध्या यात ‘शॉर्टकट’ आला आहे. शहरात बहुतांश घरांमध्ये शेवया बनविण्याऐवजी त्याची ऑर्डर दिली जाते. त्यानुसार, रेडिमेड शेवया विकत घेतल्या जातात. महिलांनो तुम्हीही जर विकतच्या शेवया खात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.तुम्ही डोळे झाकून बाजारातून शेवया विकत घेता मात्र तुम्हाला माहितीये का ते कसे तयार होतात? एका फॅक्टरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जो बघून तुम्हालाही धक्का बसेल.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, खीर बनवण्यासाठी आपण ज्या शेवया वापरतो त्या फॅक्टरीमध्ये अस्वच्छ जागेत कशाप्रकारे तयार केल्या जात आहेत. एवढंच नाहीतर त्यामध्ये शेवयांना विशिष्ठ रंग येण्यासाठी ते वेगळा रंगही टाकत आहेत.  या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, या फॅक्टरीमध्ये किती अस्वच्छता दिसत आहे.  हा एक प्रकारे लोकांच्या जीवाशी खेळच आहे. हे खाल्ल्यावर नक्कीच आरोग्यावर त्याचे वाईट परिणाम होतील. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नागरिक प्रचंड संतापले आहेत.

पाहा व्हिडीओ

बाजारात आधीच मोठ्या प्रमाणावर आपली फसवणूक होत असते. भेसळयुक्त पदार्थ, प्रक्रिया केलेले पदार्थ खाण्याशिवाय आता आपल्याला पर्याय नाही. कारण- आता सर्वच पदार्थांमध्ये भेसळ केली जाते. त्यामुळेच हल्ली आजारी पडण्याचं प्रमाण वाढलं आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ anil.beniwal29 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी प्रचंड संतापले असून कारवाईची मागणी करत आहेत.