Shocking video: डोंगर, दऱ्या आणि नद्यांचे सौंदर्य पाहायला कोणाला आवडत नाही. धबधब्यांवरून पडणारे कोसळते पाणी आणि आकाशातील ढगांना स्पर्श करणाऱ्या डोंगरांमध्ये सुट्ट्या घालवण्याची एक वेगळीच मज्जा असते. त्यात अथांग समुद्रातील जैवविविधता आपल्या सगळ्यांनाच थक्क करणारी आहे. असे म्हणतात की आग, हवा आणि पाण्याशी कधीही खेळू नये कारण ते प्राणघातक ठरू शकते. कधी व्हिडीओमुळे तर कधी फोनवरून घेतलेल्या सेल्फीमुळे अनेकदा लोकांना जीवगमवावा लागला आहे. नुकताच एक समुद्रातील भयावह व्हिडीओ व्हायरल होत आहे. समुद्र खवळला की मग कुणाचेच खरं नाही. अशीच एक घटना सध्या सोशल मीडियावर समोर आली आहे. यामध्ये एका लाटेनं अख्खी बोट खोल पाण्यात बुडाली अन् एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोशल मीडियावर लोक प्रसिद्धी मिळवण्यासाठी काहीही करण्याची तयारी दाखवतात. बऱ्याचदा लोक यासाठी आपल्या जीवाची देखील पर्वा करत नाही. हीच हिरोगीरी कधीकधी जिवावरही बेतत. असाच एक समुद्रातील व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओत तुम्हाला एक अथांग समुद्र दिसत आहे.या समुद्रात एक लहान बोट आहे आणि या बोटीचा व्हिडिओ त्याच समुद्रात असलेल्या दुसऱ्या मोठ्या बोटीवरील एका व्यक्तीने शूट केला आहे. खवळलेला समुद्र, बोटीत शिरलेले पाणी आणि कोणत्याही क्षणी समोर जीवाचं बरं वाईट होण्याची भीती स्पष्ट दिसत होती. व्हिडिओत पुढे पाहिले तर समुद्रात एक प्रचंड लाट येते आणि तिथे असलेल्या बोटीला पूर्ण उलटी-पालटी करते.धक्कादायक म्हणजे त्या बोटीवर काही व्यक्ती दिसून येत आहेत.

अशा प्रकारे पाण्याशी खेळणं, रिस्क घेणं किती महागात पडू शकतं हे हा व्हिडीओ पाहून लक्षात येत आहे. 

पाहा व्हिडीओ

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून zhenya__05 या अकाउंटवर व्हिडिओ अपलोड करण्यात आलेला आहे,मात्र व्हिडिओ कुठला आहे हे समजले नाही. गेल्या काही वर्षांमध्ये सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या व्हिडीओप्रमाणेच अनेक व्हिडीओ सोशल मीडियामुळे अनेकदा समोर येतात.