Viral video: हत्तीला पृथ्वीवरील सर्वात मोठा प्राणी मानलं जातं. हत्तींचं वजन हजारो किलोंमध्ये असतं. हा प्राणी आपल्या पायाखाली काहीही दाबून त्याचा विनाश करू शकतात. अनेकदा हा प्राणी माणसांसोबतही राहातो, मात्र शेवटी तो आहे जंगलीच. त्यामुळे हा प्राणी जंगलात राहिलेलंच अधिक चांगलं असतं आणि त्यांनाही कदाचित जंगलातच आवडतं. हेच जर मानवी वस्तीत आले तर मात्र आपली काही खैर नाही. अशीच एक धक्कादायक घटना सध्या समोर आली आहे. यामध्ये हत्तीला भूक लागली आणि त्यानंतर चवताळलेल्या हत्तीनं काय केलं हे पाहून तुम्हीही अवाक् व्हाल..

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हत्ती दिसायला जितका मोठा असतो, तितकाच मोठा आहारही त्याला लागतो. त्यामुळे, जेव्हा त्याला भूक लागते तेव्हा तो एखादं मोठं झाडंही मुळापासून उखडतो. मात्र, सध्या सोशल मीडियावर एका हत्तीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा हत्ती भूक लागल्यावर गवत किंवा फळं नाही तर थेट धान्याच्या गोदामात शिरतो. हा हत्ती भूकेमुळे कावरा-बावरा झाला असून तो समोर असलेल्या बंद गोदामाचं शटर तोडून त्यातलं धान्य खाताना दिसत आहे. यावेळी आजूबाजूला लोकंही दिसत आहे. आजूबाजूचे लोक हत्तीला हकलवताना दिसत आहेत. हत्ती मध्येच आजूबाजूला असलेल्या जमावावरही हल्ला करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
paaru serial zee marathi shweta kharat entry
‘पारू’ मालिकेत होणार लोकप्रिय अभिनेत्रीची एन्ट्री! साकारणार खलनायिका, तुम्ही ओळखलंत का? पाहा प्रोमो
david dhawan advice huma qureshi on weight
“तुला खूप लोक सांगतील वजन कमी कर, सर्जरी कर, पण…”, हुमा कुरेशीला प्रसिद्ध दिग्दर्शकाने वजनाबद्दल दिलेला सल्ला, म्हणाली…
Rakul Preet Singh opens up about her diet
हळदीच्या पाण्याचे सेवन अन् दुपारच्या जेवणात…; रकुल प्रीत सिंगने सांगितला तिचा डाएट प्लॅन; म्हणाली, “रात्रीचे जेवण…”
Shocking video Year Old Boy Slaps Mother Repeatedly After Finding Her Over Drug Use
पोटच्या मुलानं आईला भररस्त्यात बेदम मारलं; कारण ऐकून नेटकरी म्हणाले बरोबर केलं; VIDEO पाहून सांगा तुम्हाला काय वाटतं

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> जगभरातल्या जेवणात वापरलं जाणारं हिंग कसे बनते माहितीये का? ‘हा’ Video एकदा पहाच

प्राण्यांच्या हल्ल्याचे व्हिडिओ अतिशय भयानक आणि थरकाप उडवणारे असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. @nareshbahrain नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. काही वेळातच हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेला पहायला मिळाला. व्हिडीओवर भरपूर कमेंटही येताना दिसत आहेत.एकाने यावर प्रतिक्रिया दिली आहे की, प्राण्यांना जर आपण त्यांना त्रास दिला नाही तर ते आपल्याला त्रास देणार नाहीत. अशी प्रतिक्रिया दिली आहे.