Shocking video: सोशल मीडियावर दिवसभरात भरपूर व्हिडीओ व्हायरल होतात. यामध्ये निरनिराळ्या प्रकारचे व्हायरल व्हिडीओ पहायला मिळातात. मजेशीर, भावनिक, विचित्र, धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात. मात्र काही काळापासून असे काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत ज्यामध्ये अचानक लोकांचे मृत्यू होत आहेत. अन्न खाताना, व्यायामशाळेत व्यायाम करताना किंवा नाचत असतानाही लोकांचा अचानक मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या. यामध्ये आता आणखी एका व्हिडीओची भर पडली आहे.
राजस्थानच्या कोटामधून एक वेदनादायक घटना समोर आली आहे. आजारी पत्नीसाठी स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या व्यक्तीवर निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी दुःखाचा डोंगर कोसळला. नोकरीच्या शेवटच्या दिवशी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी एका छोट्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी सर्वांनी अधिकारी आणि त्यांच्या पत्नीचा सत्कार केला. यानंतर अचानक महिला खाली कोसळली अन् जागीच मृत्यू झाला. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
आयुष्याच्या शेवटच्या वळणावर पती-पत्नीची साथ खूप मोलाची असते. यासाठीच अधिकाऱ्याने आजारी पत्नीच्या देखभालीसाठी नोकरीतून लवकर निवृत्ती घेतली, जेणेकरून ते आपल्या आयुष्यातील शेवटची वर्षे तिच्यासोबत घालवू शकतील. पण आयुष्यात काही वेगळंच लिहिलं होतं. अचानक झालेल्या दुर्दैवी अपघाताने सर्वांनाच धक्का बसला आणि त्या अधिकाऱ्याच्या आयुष्यातील आनंद उध्वस्त झाला. संपूर्ण देशात हृदयविकाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. तरुण आणि वृद्धांमध्येही हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढले आहे. मोबाईलवर गेम खेळत असताना, खेळताना, धावत असताना, नाचताना आणि अगदी निष्क्रिय बसल्यानेही अनेकांना हृदयविकाराचा झटका येतो.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> “अरे हे ट्रक चालक सुधारणार तरी कधी?” घाटात अक्षरश: हद्दच पार केली; थरारक VIDEO पाहून तुम्हीच सांगा चूक कुणाची?
देवेंद्र चंदन, हे सेंट्रल वेअरहाऊसमध्ये व्यवस्थापक पदावर कार्यरत होते. पत्नीच्या आजारपणात तिची काळजी घेण्यासाठी, त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती.आजारी असणाऱ्या दीपिका त्या दिवशी खूप खुश होती. पती निवृत्तीनंतर आता पूर्णवेळ आपल्याजवळ असणार, याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. मात्र अचानक दीपिका यांची प्रकृती खालावली आणि त्या खाली कोसळल्या. या घटनेनंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @Zinda_Avdhesh नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरीही हळहळ व्यक्त करत आहेत. एकानं म्हंटलंय “मृत्यू हेच अंतिम सत्य” तर आणखी एकानं “असा शेवट नको रे देवा” अशी प्रतिक्रिया दिली आहे.