Viral video: हल्ली तरुण पिढीला चायनीज फूडचे वेड लागले आहे. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या हातगाड्यांवरचे पदार्थ अनेक जण खातात. असे काही पदार्थ विशिष्ट चवीमुळे प्रसिद्ध होतात. हातगाडीवर हे पदार्थ तयार करताना स्वच्छता बाळगली जात आहे का किंवा संबंधित हातगाडीच्या परिसरात स्वच्छता आहे का, याकडे नकळत दुर्लक्ष केलं जातं. असे पदार्थ तयार करताना किंवा हातगाडीच्या परिसरातल्या अस्वच्छतेबाबत यापूर्वी अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र, हे पदार्थ कुठे बनतात, कसे बनतात याबद्दल आपल्याला काही माहीत नसते. असाच एक किळसवाणा व्हिडीओ समोर आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आपण सगळेच नूडल्स आवडीने खातो, सर्वच जण त्याच्यावर ताव मारताना दिसतात. मात्र, हेच नूडल्स बनवतानाचा एक किळसवाणा प्रकार सध्या समोर आला आहे. या नूडल्समध्ये अशी गोष्ट आढळली आहे, जी पाहिल्यावर कदाचित तुम्ही ते खाण्याचं धाडस पुन्हा करणार नाही,.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, सुरुवातीपासून नूडल्स तयार करण्याची प्रक्रिया दाखवण्यात आली आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, लाकडी फळीवर नूडल्स पसरवलेले दिसते. विशेष म्हणजे त्या नूडल्समध्ये मोठे किडे आढळले आहेत, जे पाहून कोणाच्याही मनात अस्वस्थता निर्माण होईल. धक्कादायक बाब म्हणजे हेच चाऊमीन लोकांना खायला दिले जात आहेत. त्या ठिकाणी आजूबाजूला संपूर्ण अस्वच्छता दिसत आहे.  हेच नूडल्स आता रस्त्याच्या कडेला चायनीजच्या गाड्यांवर जाणार आणि तिथून आपल्या पोटात. तुम्हीही हा व्हिडीओ पाहा आणि ठरवा यापुढे नूडल्स खायचे की नाही.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> एकेकाळी दुबईत इंजिनिअर असलेल्या व्यक्तीवर आज ‘ही’ वेळ; VIDEO पाहून तुम्हीच सांगा त्याचं काय चुकलं?

सोशल मीडियावर sandeep_jalndhriya1984 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला असून कॅप्शनमध्ये “नूडल्समध्ये सापडले वर्म्स.” लिहिलं आहे. व्हिडीओ पाहून नेटकरीही चांगलेच संतापले आहेत. नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

‘स्वच्छता पाळा, आजार दूर ठेवा’ असं म्हटलं जातं. त्यामागे मोठा अर्थ आहे. घर, घराचा परिसर स्वच्छ ठेवल्यास रोगराई येत नाही आणि लोकांचं आरोग्य चांगलं राहतं. या नियमांचं पालन अन्नपदार्थ तयार करतानादेखील महत्त्वाचं आहे; मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ रस्त्यावरचे अन्नपदार्थ खाणाऱ्यांनी पाहिला, तर त्यांना नक्कीच धक्का बसेल.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shocking video if you are eating chowmein then be aware worms found in noodles video viral on social media srk