Shocking video: आलं आणि लसूण दोन्ही पदार्थांचा भारतीय जेवणामध्ये भरपूर प्रमाणात वापर होतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दोन्ही पदार्थांमध्ये शरीराला आवश्यक असणारे पोषक गुणधर्म अधिक प्रमाणात आढळतात. आलं आणि लसूण या दोन्ही पदार्थात अँटीइन्फ्लेमेटरी तत्व असतात. यामुळे हृदयरोगी व्यक्तींनाही फायदा मिळतो. याशिवाय आलं-लसणात अँटीकॅन्सर गुण असतात. प्रतिकारशक्ती वाढण्याची योग्य क्षमता यामध्ये असते. हीच पेस्ट अनेकजण घरात तयार न करता बाहेरून तयार स्वरुपाची घेऊन येतात. तुम्हीही विकतची आले लसूण पेस्ट वापरत असाल तर हा व्हिडीओ पाहाच. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल.

लसणाची पेस्ट म्हणजे प्रत्येक पदार्थाची चव वाढविण्यासाठीचा आवश्यक आणि महत्वाचा जिन्नस होय. आलं, लसूण न वापरता जेवण करणे याची कल्पनाच आपण करु शकत नाही. झणझणीत, रस्सेदार ग्रेव्ही करायच्या म्हटल्या की त्यात आलं – लसूण पाहिजेच. आपल्यापैकी बऱ्याच गृहिणींना जेवणात आलं – लसणाची पेस्ट वापरण्याची सवय असते. एखाद्या दिवशी आलं – लसणाची पेस्ट जेवणात नसेल तर जेवणाला पाहिजे तशी चवच येत नाही. परंतु अनेक वेळा धावपळीत आले लसूण सोलून त्याची पेस्ट बनवायला वेळ नसतो. त्यामुळे महिला विकतची पेस्ट आणतात आणि वापरतात. पण तुम्ही कधी विचार केलाय का की ही पेस्ट कशी बनवली जाते. नाही ना…मग हा व्हिडीओ बघून यापुढे आले-लसूण पेस्ट विकत घेताना शंभर वेळा विचार कराल.

Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
Man wrote message for his wife in back of the car video goes viral
किती ते प्रेम! नवऱ्यानं बायकोसाठी कारच्या मागे लिहला खास मेसेज; रस्त्यावर सर्व बघतच राहिले, VIDEO पाहून कराल कौतुक
Dirty Ice Cream Making Video never buy and eat 5 rupees ice cream in shop
पाच रुपयांत मिळणारे कप आईस्क्रीम खाणाऱ्यांनो ‘हा’ Video पाहाच; पुन्हा खाताना १०० वेळा कराल विचार
Ganpati aagaman rush in aagman sohala shocking video
गणपती आगमनाची भीषण बाजू; VIDEO पाहून थरकाप उडेल, पाहा आणि तुम्हीच सांगा हे कितपत योग्य?
Really last digit of your mobile number tell about your nature and personality
तुमच्या मोबाईलचा शेवटचा अंक खरंच सांगतो तुमचा स्वभाव? सोशल मीडियावर VIDEO चर्चेत
anganwadi worker cross the flooded river video goes viral
Video : पूर आलेली नदी ओलांडण्यासाठी अंगणवाडी सेविकेने काय केले?
Puneri pati viral for parking in his spot funny puneri pati goes viral
PHOTO: पुणेकरांचा नाद नाय! गेट समोर गाडी पार्क करणाऱ्यांना आकर्षक बक्षिसे; शेवटचं बक्षिस वाचून पोट धरुन हसाल

नागरिक प्रचंड संतापले

हा व्हिडीओ हैदराबादमधल्या एका फॅक्टरीमधला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुण फॅक्टरीमध्ये आलं आणि लसणाच्या पाकळ्यांवर अक्षरश: उभा राहून त्यावर नाचत आहे. तो पायाने लसूण बारीक करताना दिसत आहे. लसणाच्या पिशव्या या व्हिडीओमध्ये दिसत असून हा तरुण लसूण जमिनीवर टाकून त्यावर उभा आहे. हा एक प्रकारे लोकांच्या जीवाशी खेळच आहे. हे खाल्ल्यावर नक्कीच आरोग्यावर त्याचे वाईट परिणाम होतील. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नागरिक प्रचंड संतापले आहेत.

खाण्यापूर्वी १०० वेळा विचार कराल

बाजारात आधीच मोठ्या प्रमाणावर आपली फसवणूक होत असते. भेसळयुक्त पदार्थ, प्रक्रिया केलेले पदार्थ खाण्याशिवाय आता आपल्याला पर्याय नाही. कारण- आता सर्वच पदार्थांमध्ये भेसळ केली जाते. त्यामुळेच हल्ली आजारी पडण्याचं प्रमाण वाढलं आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> गणपती आगमनाची भीषण बाजू; VIDEO पाहून थरकाप उडेल, पाहा आणि तुम्हीच सांगा हे कितपत योग्य?

हा व्हिडीओ सोशल मीडियावर reporter_khizar_farooqui नावाच्या इनस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर नेटकरी संतापजनक प्रतिक्रिया देत आहेत.