Shocking video: प्रेमात माणूस इतर सगळं विसरून जातो, असं म्हटलं जातं. मात्र अनेकदा हे प्रेमच अतिशय भयानक रूप घेतं. जोडप्यामधील एकाने दुसऱ्यासोबत अतिशय धक्कादायक कृत्य केल्याच्या किंवा हत्या केल्याच्याही घटना समोर येत असतात. आता आणखी एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधून समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

प्रेम ही खरं तर सहजसुलभ भावना आहे. आजकाल लोक प्रेमासाठी काहीही करण्यास तयार असतात. प्रेमासाठी विरोध, मरण पत्करण्याचीदेखील लोकांची तयारी असते. अगदी अशाप्रकारच्या घटनांविषयी आपण बऱ्याचदा वाचतो, ऐकतो. मात्र हेच प्रेम जेव्हा भयानक रूप धारण करतं तेव्हा सगळं संपत. सध्या समोर आलेल्या प्रकरणातही असंच काहीसं घडलं आहे. उत्तर प्रदेशच्या अमरोहामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. या गावामध्ये एका माथेफिरु बॉयफ्रेंडने त्याच्या गर्लफ्रेंडचा गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला. रस्त्यावरुन जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्या तरुणीचा जीव वाचवला. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हृदयाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेचा व्हिडीओ लोक मोबाईलमध्ये शूट करत होते, तर फार कमी लोक तरुणीचा जीव वाचवण्यासाठी पुढे आले. हल्ला झाल्यानंतर तरुणी बेशुद्ध पडली. त्यानंतर तिला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. पोलिसांनी माथेफिरु तरुणाविरोधात गुन्हा दाखल केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

actor Nitin Chauhaan dies at 35
‘क्राइम पेट्रोल’ फेम अभिनेत्याचं निधन, ३५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Tiger Cubs Hunting Deer In Ranthambore Animal shocking Video
शेवटी रक्त वाघाचं आहे; वाघाच्या पिल्लानं केली भल्यामोठ्या हरणाची शिकार, VIDEO पाहून थक्क व्हाल
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Terrifying video shows skydiving instructor jumping off cliff before falling to death shocking video
VIDEO: मृत्यू कसा जाळ्यात ओढतो पाहा; स्कायडायव्हिंगवेळी प्रशिक्षकाचा तोल गेला, २० वर्षांचा अनुभव असतानाही नेमकं काय घडलं?
sai godbole brand ambassador of the apple company
मराठी अभिनेत्रीची लेक झाली ‘Apple’ कंपनीची ब्रँड अँबॅसेडर! आईसाठी अभिमानास्पद क्षण; म्हणाली, “लॉस एंजेलिस येथे…”
Shocking video of CRPF Jawan Catches Wife Trying To Elope, Thrashes Her Lover In Front Of Crowd At Patna Station
झालं का फिरुन? सीआरपीएफ जवानाने बायकोला बॉयफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं; VIDEO पाहून बसेल धक्का
Kanpur Fire
Kanpur Fire : धक्कादायक! दिव्यामुळे घराला लागली आग; उद्योगपती पती-पत्नीसह मोलकरणीचा दुर्दैवी मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, बेशुद्ध पडलेली तरुणी आणि तिचा बॉयफ्रेंड मागील चार वर्षांपासून एकत्र आहेत. दुसऱ्या मुलांशी मैत्री केल्याने बॉयफ्रेंडने हा जीवघेणा हल्ला केला असा अंदाज वर्तवला जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस रुग्णालयात पोहोचले. त्यांनी तरुणीच्या बॉयफ्रेंडविरोधात गुन्हा दाखल केला आहे. स्थानिक पोलीस माथेफिरु बॉयफ्रेंडचा शोध घेत आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “देव माफ करेल कर्म नाही” तरुणानं सापावर पेट्रोल टाकलं अन् माणसांमध्ये जास्त विष असतं हे सिद्ध केलं; VIDEO पाहून संतापले लोक

,

सोशल मीडियावर @IndianTrendX नावाच्या एक्स अकाऊंटवरुन हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावर आता नेटकरी संताप व्यक्त करत आहे. दिवसाढवळ्या अशाप्रकारे घटना वारंवार घडत असल्यानं आता महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा उपस्थित होतोय.

Story img Loader