Shocking video: सध्या चायनीज फूडने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच मनावर गारुड घालतं आहे. सर्वजण अगदी मिटक्या मारत चायनीजचे पदार्थ फस्त करतात हे तर तुम्हाला ठाऊक आहेच.सध्या चायनिज पदार्थांची सर्वांनाच चटक लागली आहे. बाहेर जेवायला जायचं म्हटलं की बरेच जण चायनिज खाण्याचाच बेत करतात. पण चायनिज पदार्थाचं अतिसेवन आरोग्यासाठी धोकादायक आहे.आपल्याला चायनिज गोष्टींचं आकर्षण पहिल्यापासूनच आहे. अगदी चिनी बनावटीच्या वस्तूंपासून चायनिज पदार्थांपर्यंत. चायनिज पदार्थांची तर सध्या सर्वांनाच चटक लागली आहे. चीनमध्ये मिळणारे चायनिज पदार्थ आणि भारतात मिळणारे चायनिज पदार्थ यात फरक आहे. भारतीयांच्या जिभेला पूरक ठरतील, अशा चवीचे हे पदार्थ तयार केले जातात. रस्त्याशेजारी फुटपाथवर गल्लोगल्ली मिळणारे चायनिज पदार्थ सहज आणि स्वस्तात उपलब्ध असल्यामुळं तेच खाण्याकडे बहुतेकांचा कल असतो.

जगभरात भरपूर फूडी लोक आहेत. आजकाल लोकांना बाहेरचं खायला आवडतं. त्यामुळे स्ट्रीट फूड, ढाबा, हॉटेलमध्ये कायमच गर्दी पहायला मिळते. मात्र आपण आवडीनं खात असलेले पदार्थ स्वच्छता असलेल्या ठिकाणी बनवलेत का? हा प्रश्न नेहमीच डोळ्यासमोर येतो. सोशल मीडियावर तर खायला बनवताना स्वच्छतेबाबत हलगर्जीपणा असलेले अनेक फोटो, व्हिडीओ समोर येत असतात. असाच आणखी एक व्हिडीओ समोर आलाय ज्यामध्ये एका हॉटेलच्या स्वयंपाकघरातील किळसवाणा प्रकार समोर आला. ज्याला पाहून तुम्हाला अक्षरशः उलटी येईल.

हॉटेलमधील स्वयंपाक घरातील एक व्हिडीओ सध्या इंटरनेटवर खळबळ उडवत आहे. व्हिडीओतील स्वयंपाक घरातील अवस्था पाहून तुम्हाला किळस, उलटी आल्याशिवाय राहणार नाही. हा व्हिडीओ पाहून लोकांनी संताप व्यक्त केलाय.या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हॉटेलच्या किचनमध्ये किसून ठेवलेल्या कोबीवर एक मोठा उंदीर फिरत आहे आणि खात आहे. यावेळी तो कोबीही तसाच उघडा ठेवला आहे आणि उंदीरही बिनधास्तपणे त्यावरुन फिरत आहे. दरम्यान हा व्हिडीओ बदलापूरमधील कोहारीस किचन या हॉटेलचा असल्याचा दावा केला जात आहे. तसेच व्हिडीओमध्येही हॉटेलचं नाव दिसत आहे. त्यामुळे बदलापूरकरांनो इथून पुढे चायनीज खाताना या सगळ्या प्रकारांचाही विचार करा.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ badlapurtimea नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत संताप व्यक्त करत आहेत.

‘स्वच्छता पाळा, आजार दूर ठेवा’ असं म्हटलं जातं. त्यामागे मोठा अर्थ आहे. घर, घराचा परिसर स्वच्छ ठेवल्यास रोगराई येत नाही आणि लोकांचं आरोग्य चांगलं राहतं. या नियमांचं पालन अन्नपदार्थ तयार करतानादेखील महत्त्वाचं आहे; मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ रस्त्यावरचे अन्नपदार्थ खाणाऱ्यांनी पाहिला, तर त्यांना नक्कीच धक्का बसेल.

Story img Loader