Delhi video viral: सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असल्याचे आपण अनेकदा पाहतो. यामध्ये काही व्हिडीओ हसवणारे असतात तर काही व्हिडीओ हे रडवणारे असतात. तर असे काही व्हिडीओ आहेत जे तुम्हाला भावूक करतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ दिल्लीतील गाल घोंटू टोळीचा आहे. ही टोळी लोकांचा गळा दाबून त्यांना लुटते. नुकताच दिल्लीतून या टोळीचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे, जो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लूटमारीच्या, चोरीच्या गुन्ह्यांची संख्या वाढतच चालली आहे. चोर चोरी करण्यासाठी नवनवीन आयडिया घेऊन येत असतात. कितीही चलाख चोर असूदेत, पोलिस चोराला शोधून काढतातच. तरीही चोऱ्यांचे प्रमाण काही कमी होत नाही. अशातच आणखी एक प्रकार दिल्लीमधून समोर आला आहे.

भाजी विक्रेत्याला गळा आवळून लुटले

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक भाजी विक्रेता जाताना दिसत आहे. भाजी विक्रेता रस्त्याच्या मधोमध एका घरासमोर थांबतो आणि वर बघायला लागतो, इतक्यात एक तरुण भाजी विक्रेत्याच्या मागे येऊन उभा राहतो. भाजी विक्रेत्याला काही समजायच्या आतच तो तरुण त्याला मागून पकडतो आणि त्याचा गळा दाबायला लागतो. दरम्यान, समोरून दुसरा तरुण धावत येतो आणि त्याच्याजवळ असलेलं सगळे सामान, पैसे घेतो. दोघेही भाजी विक्रेत्याकडून पैसे लूटतात आणि लगेच फरार होतात. ही संपूर्ण घटना परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ही घटना दिल्लीतील भजनपुरा भागातील असल्याची माहिती आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> मुंबईच्या ‘बर्गर किंग’मधल्या बर्गरमध्ये महिलेला काय आढळलं पाहा; धक्कादायक VIDEO पाहून झोप उडेल

हा व्हिडीओ व्हायरल होत असून @youthobserver.news नावाच्या पेजवरून इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून व्हिडीओला १२०० हून अधिक लाईक्स मिळाले आहेत. यावर लोकांकडून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. कमेंट करताना एका युजरने लिहिले आहे की, ‘रोजगार नाही, ही रोजगाराची चूक आहे.’ तर दुसऱ्या युजरने कमेंट केली आहे की, ‘यात एक चूक आहे, दिल्लीत मिळणारे ड्रग्स बंद करा.’ आणखी एकाने कमेंट करताना अशा लोकांना लाज वाटली पाहिजे असे लिहिले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shocking video in delhi two miscreants robbed a vegetable seller video goes viral on social media srk