Viral video: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. काहीवेळा गोष्टी इतक्या मजेदार असतात की लोकांना पाहून प्रचंड आश्चर्य वाटतं तर कधी धक्का देखील बसतो. असाच एक व्हिडीओ आता समोर आला आहे.ट्रेन नेहमी प्रवाशांनी खचाखच भरलेली असते. गर्दीमुळे चाकरमानी अक्षरश:लोकल ट्रेनच्या दारातही उभे राहूनही चाकरमानी प्रवास करतात. ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेकदा उभे राहूनच प्रवास करावा लागतो. आजवर ज्यांनी लोकलने प्रवास केलाय त्यांच्यासाठी ट्रेनमधील भांडणं हा काही नवीन विषय नाही. लोकल ट्रेनमध्ये तुम्ही सीटवरून भांडणं पाहिलीच आहेत. पण आता पुन्हा एकदा सीटवरून झालेल्या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ट्रेनमध्ये भर गर्दीत महिलांनी सीटसाठी मर्यादाच ओलांडली आहे. स्वतः एक महिला असून तिने दुसऱ्या महिलेसोबत जे केलं आहे ते संतापजनक आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये लोकलमध्ये सीटवर बसण्यावरुन दोन महिलांची तुफान भांडणं सुरु झाली. हा हाणामारीचा व्हायरल व्हिडिओ आता जोरदार चर्चेत आहे. चला तर नेमकं काय घडलं ते जाणून घेऊया…
लोकल ट्रेनमध्ये महिलांमधील हाणामारी काही नवीन नाही. जागेच्या वादातून महिलांमध्ये तुफान मारामारीचे अनेक व्हिडीओ आपण पाहिले आहेत. मात्र सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये महिलांनी अक्षरश: हद्दच पार केलीय. स्वत: महिला असूनही या महिलांनी अशाप्रकारे एकमेकींना मारलंय की पाहून तुम्हालाही धक्का बसेल. एवढंच नाहीतर रेल्वेच्या जनरल डब्यात आजूबाजूला एवढे पुरुष असतानाही त्यांनी भान न ठेवता एकमेकींच्या साड्या ओढल्या आहेत.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ट्रेनमध्ये जनरल डब्यामध्ये प्रचंड गर्दी दिसत आहे. नीट उभं राहायलाही जागा दिसत नाहीये, अशातच काही वेळात तीन महिलांमध्ये तुफान हाणामारी सुरु होते. या मारामारीचं स्वरुप इतकं गंभीर आहे की, यामध्ये एखाद्याचा जीव जाऊ शकतो. यात एक तीन महिलांमध्ये मारामारी सुरु आहे. अक्षरश: या एकमेकींचे केस ओढून कानाखाली मारत आहेत, गळा पकडत आहेत. व्हिडिओत महिलांची हाणामारी पाहून काही प्रवाशांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र काही केल्या त्या ऐकत नाही. एवढंच नाही तर आजूबाजूला पुरुष आहेत याचंही त्यांना भान राहिलं नाही केवळ एका सीटसाठी त्या एकमेकींच्या अंगावर धावून जात आहेत, साड्या ओढत आहे. तिथे उपस्थित एका प्रवाशानेच संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद केली आहे. तुम्हीच सांगा यामध्ये नेमकी चूक कुणाची आहे.
पाहा व्हिडीओ
दरम्यान, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्याही काळजात धस्स होईल. नेटकऱ्यांना ही घटना अजिबात आवडलेली नाही. त्यांनी यासंबंधीच्या प्रतिक्रिया कमेंट सेक्शनमध्ये नोंदवल्या आहेत. एकानं म्हंटलंय, हे नेहमीचंच आहे तर आणखी एका एका युजरने महिलांच्या हिंसक हाणामारीवर प्रतिक्रिया देत “इतकही हद्द पार करू नये” असं म्हंटलंय.