Shocking video: मुंबई लोकल ट्रेनला मुंबईच हृदय म्हणतात. लोकल ट्रेन बंद पडली तर मुंबईच थांबते. अशी ही मुंबईचा जीव असणारी लोकल ट्रेन सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. मुंबई लोकलमधील भांडणाचे आणि मारामारीचे सत्र वाढतच चालले आहे. गेल्या काही दिवसांपासून ट्रेनमध्ये झालेल्या मारामारीचे आणि भांडणांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये महिलांमधील हाणामारी काही नवीन नाही. जागेच्या वादातून महिलांमध्ये तुफान मारामारीचे अनेक व्हिडीओ आपण पाहिले आहेत.

सध्या असाच एक मंबई लोकलमधला भयानक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. यामध्ये महिलांची हाणामारी आणि आक्रमकता पाहून तुम्हालाही धडकी भरेल. व्हिडीओ पाहून शेवटी तुम्हीच सांगा यामध्ये नेमकी चूक कुणाची आहे.

Vishal Gawli News
Vishal Gawli : “विशाल गवळीने माझ्या मुलीला जवळ ओढलं, तिचं तोंड दाबलं आणि…”, पीडितेच्या आईने सांगितला दोन वर्षांपूर्वीचा ‘तो’ प्रसंंग
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
sexual assault at anna university
Chennai Crime: चेन्नईत रस्त्यावरील ठेलेवाल्याचा कॉलेज कॅम्पसमध्येच विद्यार्थिनीवर बलात्कार; सत्ताधाऱ्यांशी संबंध असल्याचा विरोधकांचा आरोप!
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”
Aai Kuthe Kay Karte Fame Kaumudi Walokar Sangeet Ceremony
Video : “कौमुदी या अखंड ताऱ्यांच्या…”, फिल्मी स्टाइल प्रपोज, जबरदस्त डान्स अन्…; मराठी अभिनेत्रीचा ‘असा’ पार पडला संगीत सोहळा
epileptic attack, youth epileptic attack, Pune,
पुणे : अपघातानंतर तरुणाला अपस्माराचा झटका, पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरेंच्या तत्परतेमुळे वैद्यकीय मदत
lure of marriage , pretending to be doctor,
सातारा : डॉक्टर असल्याचे भासवून लग्नाच्या आमिषाने अत्याचार, कराडमध्ये गुन्हा दाखल

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, मुंबई लोकलमध्ये महिलांच्या डब्यामध्ये प्रचंड गर्दी दिसत आहे. नीट उभं राहायलाही जागा दिसत नाहीये, अशातच काही वेळात तीन महिलांमध्ये तुफान हाणामारी सुरु होते. या मारामारीचं स्वरुप इतकं गंभीर आहे की, यामध्ये एखाद्याचा जीव जाऊ शकतो. यात एका तरुणीला अन् दोन महिला बेदम मारत आहेत. अक्षरश: या एकमेकींचे केस ओढून कानाखाली मारत आहेत, गळा पकडत आहेत. व्हिडिओत तरुणींचा हाणामारी पाहून अन् महिला प्रवाशी त्यांना थांबवण्याच प्रयत्न करत आहेत मात्र काही केल्या त्या ऐकत नाही. दरम्यान मध्येच ही मारामारी थांबते आणि इतर महिला त्यांना लांब करतात मात्र पांढरं टी-शर्ट घातलेल्या महिलेने पुन्हा तरुणीला मारलं आणि पुन्हा मारामारी सुरु झाली. त्यातील एका महिलेने संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद केली आहे.तुम्हीच सांगा यामध्ये नेमकी चूक कुणाची आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: “जेव्हा कर्माचे फळ लगेच मिळते” पेट्रालचे पैसे न देता पळून जात होता कारचालक इतक्यात डाव पलटला; नेमकं काय घडलं?

दरम्यान, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्याही काळजात धस्स होईल. नेटकऱ्यांना ही घटना अजिबात आवडलेली नाही. त्यांनी यासंबंधीच्या प्रतिक्रिया कमेंट सेक्शनमध्ये नोंदवल्या आहेत. एकानं म्हंटलंय, हे नेहमीचंच आहे तर आणखी एका एका युजरने महिलांच्या हिंसक हाणामारीवर प्रतिक्रिया देत “बापरे जीव जाईल तिचा” अशी प्रतिक्रिया दिलीय.

लोकलसेवा ही मुंबईची जीवनवाहिनी आहे. या लोकलमधून लाखो नागरिक हे रोज प्रवास करत असतात. मात्र, लांबचा प्रवास करताना जागा मिळवण्यासाठी वादाचे प्रसंग उद्भवत असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे नेहमीच होत असलेल्या अशा प्रसंगांवरून मुंबई लोकलचे हे प्रश्न कधी सुटतील हा प्रश्न पडतो. 

Story img Loader