Mumbai virar local viral video: मुंबईची लाइफलाइन असलेल्या लोकलमध्ये नेहमीच जागेच्या वादावरून भांडणं होतांना दिसतात. लोकलमधील गर्दी, चौथ्या सिटसाठी हाणामारी होत असते. गर्दीत धक्का लागल्यानं या महिलांमध्ये इतका वाद झाला की, वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. एकमेकांचे केस ओढेपर्यंत ही हाणामारी झाली.मुंबईच्या लोकल ट्रेनमधील पुरुष आणि महिलांच्या डब्यात होणारी वादावादी आणि हाणामारी सर्वांनाच माहित आहे. त्यापैकी विरार लोकल या घटनांसाठी कुप्रसिद्धच म्हणावी लागेल. महिलांच्या गुंडगिरीची अशीच घटना पुन्हा एकदा समोर आली आहे, या भांडणाचा व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल.

मुंबई लोकल ट्रेनला मुंबईच हृदय म्हणतात. लोकल ट्रेन बंद पडली तर मुंबईच थांबते. अशी ही मुंबईचा जीव असणारी लोकल ट्रेन सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. मुंबई लोकलमधील भांडणाचे आणि मारामारीचे सत्र वाढतच चालले आहे. गेल्या काही दिवसांपासून ट्रेनमध्ये झालेल्या मारामारीचे आणि भांडणांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये महिलांमधील हाणामारी काही नवीन नाही. जागेच्या वादातून महिलांमध्ये तुफान मारामारीचे अनेक व्हिडीओ आपण पाहिले आहेत. यावरुन नेहमीच होत असलेल्या अशा प्रसंगांवरून मुंबई लोकलचे हे प्रश्न कधी सुटतील हा प्रश्न पडतो.

auto driver who helped saif ali khan says not able to work
सैफला रुग्णालयात नेणाऱ्या रिक्षा चालकाने व्यक्त केली नाराजी; म्हणाला, “मी घाबरलोय कारण…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Coldplay in Mumbai local Coldplay fans bring ‘concert vibe’ to Mumbai local: ‘This city can do anything’ video viral
खरा कोल्ड प्ले कॉन्सर्ट तर मुंबई लोकलमध्ये झाला; “त्या” रात्री मुंबई लोकलमध्ये काय घडलं पाहाच, VIDEO होतोय तुफान व्हायरल
actor Nitin Chauhaan dies at 35
‘क्राइम पेट्रोल’ फेम अभिनेत्याचं निधन, ३५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला असता तर…
dharavi adani land loksatta
३१९ कोटी रुपयांत ५८ एकर भूखंड अदानींकडे, धारावीकर मुलुंडवासीयांचे शेजारी
tiger Viral Video today trending news
वाघाबरोबर फोटो काढण्यासाठी अगदी जवळ गेला अन्…; पुढे जे घडलं ते फार भयानक, पाहा थरारक VIDEO
Saif Ali Khan Attacked
Saif Ali Khan Attacked : तलावात दीड तास शोधाशोध अन् पोलिसांच्या हाती मोठा पुरावा; सैफ अली खान हल्ला प्रकरणात महत्वाची माहिती समोर

नेमकं काय घडलं?

सध्या असाच एक मंबई लोकलमधला भयानक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. यामध्ये महिलांची हाणामारी आणि आक्रमकता पाहून तुम्हालाही धडकी भरेल. व्हिडीओ पाहून शेवटी तुम्हीच सांगा यामध्ये नेमकी चूक कुणाची आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, विरार लोकलमध्ये महिलांच्या डब्यामध्ये प्रचंड गर्दी दिसत आहे. नीट उभं राहायलाही जागा दिसत नाहीये, अशातच काही वेळात एक महिला आणि तरुणीमध्ये तुफान हाणामारी सुरु होते. या मारामारीचं स्वरुप इतकं गंभीर आहे की, यामध्ये एखाद्याचा जीव जाऊ शकतो. यात एका तरुणीला ही महिला केसाला धरुन बेदम मारत आहेत. अक्षरश: या एकमेकींचे केस ओढून कानाखाली मारत आहेत, गळा पकडत आहेत. व्हिडिओत हाणामारी पाहून महिला प्रवाशी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र काही केल्या त्या ऐकत नाही. त्यातील एका महिलेने संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद केली आहे.तुम्हीच सांगा यामध्ये नेमकी चूक कुणाची आहे.

पाहा व्हिडीओ

दरम्यान, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्याही काळजात धस्स होईल. नेटकऱ्यांना ही घटना अजिबात आवडलेली नाही. त्यांनी यासंबंधीच्या प्रतिक्रिया कमेंट सेक्शनमध्ये नोंदवल्या आहेत. एकानं म्हंटलंय, “खूप भीषण आहे हे सगळं” तर आणखी एका एका युजरने महिलांच्या हिंसक हाणामारीवर प्रतिक्रिया देत “बापरे जीव जाईल तिचा” अशी प्रतिक्रिया दिलीय.

Story img Loader