Mumbai shocking video: लूटमारीच्या, चोरीच्या गुन्ह्यांची संख्या वाढतच चालली आहे. चोर चोरी करण्यासाठी नवनवीन आयडीया घेऊन येत असतात. कितीही चलाख चोर असुदेत पोलीस चोराला शोधून काढतातच. तरीही चोऱ्यांचे प्रमाण काही कमी होत नाही. कितीही चलाख चोर असुदेत पोलीस चोराला शोधून काढतातच. तरीही चोऱ्यांचे प्रमाण काही कमी होत नाही. चोर हा चोर असतो मग तो पुरुष असो वा स्त्री. चोरांचे एक वैशिष्ट्य म्हणजे चोरी करण्यापूर्वी त्यांना कोणाचीही दया येत नाही, चोरी एक हजार रुपयांची असो वा एक कोटी रुपयांची, संधी मिळताच ते हात साफ करतात. दरम्यान सध्या समोर आलेलं चोरीचं प्रकरण धक्कादायक आहे. कारण भर रस्त्यात पार्क केलेल्या कारमधून चोरी करण्यासाठी तरुणानं काय केलं पाहा, अवघ्या सेंकदात बंद कारची त्यानं काच फोडली अन् पुढे काय झालं पाहा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गेल्या अनेक वर्षांत चोरीच्या घटना वाढत चालल्या आहेत. दिवसाढवळ्या चोर लोकांच्या घरात घुसून चोरी करत आहेत; तर कधी रेल्वेमध्ये पाकिटमार, फोन चोरण्याच्या चोरांची दहशत वाढू लागली आहे. गुन्हेगारी इतकी वाढू लागली आहे की, माणूस माणुसकी विसरत चालला आहे. चोरीच्या घटनांचे असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तुम्हीही जर रस्त्यात कार पार्क करुन बिनधास्त निघून जात असाल तर आताच सावध व्हा. कारण समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हा तरुण गाडी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करतोय. बरं, ही गाडी सुद्धा साधी सुधी नाहीये, तर एका बॉलिवूड दिग्दर्शकाची आहे. पण ही चोरी करताना त्यानं एक छोटीशी चूक केली. अन् त्यामुळे तो पकडला गेला. चोरीच्या कोणत्याही घटना टाळण्यासाठी काळजी घेण्याचं आवाहन पोलिसांकडून सातत्याने केलं जातं. विशेषत: रात्रीच्या वेळी अशा घटना सर्रास घडल्याचं समोर आलं आहे. पण चक्क ऐन वर्दळीच्या रस्त्याच्या कडेला उभ्या कारची काच फोडण्याचा प्रयत्न त्यानं केला.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दिग्दर्शक वसिम आम्रोही यांची ही पोर्शे कार आहे. यावेळी एक तरुण तिथे फेऱ्या मारताना दिसत आहे, म्हणजेच तो आजुबाजूचा अंदाज घेत आहे.यावेळी कोणाची नजर त्याच्यावर नाहिये हे लक्षात घेऊन गाडीची काच फोडली. त्यानंतर गाडीमधील मिळेल ती वस्तू उचलायच्या बेतात तो होता. पण घडलं भलतंच. काच फुटताच गाडीचा सायरन वाजू लागला. या आवाजानं तो चोर घाबरला. आणि गुपचूप पळून गेला.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> कपडे फाटले तरी त्या थांबल्या नाही; एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींचा झिंज्या उपटत तुफान राडा; VIDEO पाहून व्हाल हैराण

सोशल मीडियावर viralbhayani नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला. अनेकांनी व्हिडिओला लाईक केले. या व्हिडिओवर नेटकरी प्रतिक्रिया देत आहेत. या व्हिडिओवर कमेंट करताना एका व्यक्तीने म्हटले आहे की, हा पूर्ण नियोजन करून आला होता. दुसऱ्या यूजरने लिहिले, सावध रहा, सतर्क रहा.