Shocking video: मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र कुर्ला पश्चिममध्ये झालेल्या अपघाताची मोठी चर्चा सुरु आहे. ज्यात घटनेत बेस्ट बसला भीषण अपघात होऊन भरधाव बेस्ट थेट मार्केटमध्ये घुसली होती. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाल्याची चौकशी सुरू असतानाच, एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. ट्रॅफिक टाळण्यासाठी रिक्षावाला फुटपाथवरून रिक्षा पळवत होता. पण तेवढ्यात रिक्षाचा तोल गेला आणि मग शेवटी काय घडलं हे आता तुम्हीच पाहा. हा व्हिडीओ पहिल्यानंतर आता जगायचं की नाही असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत.
रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये काही अपघात हे वाहन चालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात, तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. हा व्हिडीओ एक उदाहरण म्हणूनदेखील समोर आला आहे, ज्याला पाहून तुम्ही गाडी चालवताना किती सतर्क राहायला पाहिजे हे दाखवत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुमच्याही काळजाचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही. हा अपघात एवढा भयानक आहे की याचा व्हिडिओ पाहून कुणाच्याही अंगावर काटा उभा राहील.
‘अति घाई संकटात नेई’ हे वाक्य आपण जवळपास प्रत्येकाने वाचले आहे. कारण- वेगाने गाडी चालवून अपघात होण्यापेक्षा संथ गतीने सुखरूप घरी पोहोचलेले बरे, हा या वाक्यामागचा मुख्य उद्देश आहे. तरीदेखील काही मंडळी या सल्ल्याकडे दुर्लक्ष करतात अन् पुढे त्यांना याची मोठी किंमत मोजावी लागते. असंच या रिक्षा चालकाच्या बाबतीत घडलंय. ही घटना मैसूर या ठिकाणी घडली आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रस्त्यावर ट्रॅफिक जॅम झालं आहे. गाड्या मुंगीच्या गतीनं पुढे जाताहेत. दरम्यान एका रिक्षावाल्यानं या ट्रॅफिकपासून वाचण्यासाठी चक्क फुटपाथवरून रिक्शा नेली आणि भरदाव वेगा पळवू लागला. पण या नादात अचानक चालकाचं रिक्षावरील नियंत्रण सुटलं आणि त्यानं समोर येईल त्या व्यक्तीला उडवण्यास सुरूवात केली. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, पुढे असलेल्या बाईकचा पार चक्काचूर झाल. पण सोबतच फुटपाथवरून चालणाऱ्या लोकांना देखील दुखापत झाली.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @3rdEyeDude नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून यावर नेटकरी संतापजनक प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय यांच्यावर अशी कारवाई करा की पुन्हा कुणीही वाहतुक नियम मोडणार नाही, तर दुसऱ्या युजरने म्हंटलंय हे फार गंभीर आहे. तर आणखी एकानं म्हंटलंय, “अरे जगायचं की नाही आम्ही आता फुटपाथवरसुद्धा गाड्या यायला लागल्या आहेत.”