Viral Video : सोशल मीडियावर समुद्र किनाऱ्यावरील अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. कधी समुद्राचे दृश्य पाहून थक्क होते तर कधी येथे घडणाऱ्या अपघाताचे व्हिडीओ पाहून अंगावर काटा येतो. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक इनोव्हा कार समुद्रात बुडताना दिसत आहे. नेमकं काय घडलं, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Innova गाडी बुडाली थेट समुद्रात

या व्हायरल व्हिडीओमध्ये एक व्यक्ती या प्रकरणाविषयी सांगताना दिसतो. तो म्हणतो, “तुम्ही बघू शकता किती उलाढाल केलेली आहे. गाडी समुद्रात घेऊन गेलेले आता या गाडीचं वाटोळं लागलं. अशा प्रकरणात इन्शुरन्स कंपनी सुद्धा तुम्हाला एक रुपया सुद्धा देत नाही. कारण अशा परिस्थिती माणसाकडून घडतात. असले उद्योग करू नका जीवाशी खेळू नका. गाडी धुतलेली आहे. छत वैगरे उडून गेलेलं आहे. काही लोक इतक्या भयानक गोष्टी करतात ना, समजत नाही”

ही व्यक्ती या व्हिडीओमध्ये त्या गाडीची संपूर्ण स्थिती दाखवतो. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की एक इनोव्हा कार चक्क समुद्रात बुडालेली आहे आणि या गाडीच्या आजुबाजूला लोक जमलेली आहे. गाडीची अवस्था खूप खराब झालेली दिसून येत आहे.सुदैवाने कोणतीही जीवीत हानी झालेली नाही. या व्हिडीओवर लिहिलेय, “पर्यटक कुठलाही विचार न करता गाड्या अशा समुद्रात घेऊन जातात आणि मग असे प्रॉब्लेम्स होतात.”

हेही वाचा : PHOTO: “पगाराचा अकडा आणि जमिनीचा तुकडा…” सिंगल मुलांसाठी खास पुणेरी पाटी; वाचून तुम्हीही म्हणाल “खरं आहे भाऊ”

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : ‘एक्सप्रेशन्स असावे तर असे…’ ट्रेनमध्ये भेळ विकणाऱ्या महिलेची ॲक्टिंग पाहा; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक

marathi_autoguru या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “बुडाली इनोव्हा समुद्रात” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “कर्डे बीच वर घडली ही घटना….१४ नोव्हेंबर ला” तर एका युजरने लिहिलेय, “स्वतःच्या कष्टाच्या पैशाने घेतलेली गाडी कोण अशी धोका पत्करून बीचवर घेऊन जाणार नाही…” आणखी एका युजरने लिहिलेय, “आम्ही स्थानिक आहोत.. हे दृष्य डोळ्यादेखत पाहिलय. अशा लोकांना आम्ही वारंवार सूचना देऊन सुद्धा खूप उर्मट वागतात. आणि पुन्हा दोष आम्हालाच देणार पर्यटकांशी आम्ही नीट संवाद करत नाही. काही लोकांना आम्ही आमच्या गावकऱ्यांनी वाचवले सुद्धा आहे. पुन्हा एकदा ह्या विषयाद्वारे समुद्रावर येणाऱ्या सर्वांना कडक सूचना देतोय, आपल्या मर्यादित वागणुकीने मौज मजा करा, अतिरेकपणा करायचा असेल तर या पुढे स्वतःच स्वतः निस्तरण्याची हिम्मत बाळगा.” अनेक युजर्सनी हा व्हिडीओ पाहून संताप व्यक्त केला आहे.