Funny video: सोशल मीडियावर लग्नाचे अनेक मजेदार व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही फनी असतात, जे बघितल्या बघितल्या लोटपोट होऊन हसायला येतं. तर काही व्हिडीओ पाहून आश्चर्यही वाटतं. असे व्हिडीओ यूजर्सना आवडतातही आणि ते शेअर करून त्यावर कमेंट्सही करतात. लग्न समारंभीत नेहमीच गमती-जमती चालत राहतात. अनेक नवरी-नवरदेव गंमत करतात. तर काही पाहुणेही त्यांची मजा घेतात. खास करुन नवरदेवाच्या किंवा नवरीच्या कलवऱ्यांची तर लग्नात हमखास चर्चा असते. कधी नवरदेवाचे बूट चोरतात तर कधी नवरदेवासोबत गंमत करतात. असाच एक लग्नातला व्हिडीओ सध्या समोर आला आहे, हा व्हिडीओ पाहून तुम्ही म्हणाल अशी मेहुणी नको रे बाबा..
सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. मात्र सध्या जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे तो पाहून तुम्ही डोक्याला हाथ लावल्याशिवाय राहणार नाही. कारण या मेहुणीने चक्क आपल्या बहिणीच्या होणाऱ्या नवऱ्याला किस केलं आहे.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये नवरा नवरी बसलेले दिसत आहे. स्टेजवर खूप लोक उपस्थित आहेत.यावेळी नवरीची बहिण येते नवरेदवाच्या शेजारी बसते. यावेळी त्यांच्यामधील मस्करीमध्ये अचानक मेहुणी नवरदेवाला किस करते.हे पाहून लोकांना आश्चर्य वाटत आहे. या क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, वधू आणि वर त्यांच्या लग्नाच्या वेळी स्टेजवर बसले आहेत आणि पाहुण्यांसोबत फोटो काढत आहेत. या दरम्यान, वधूची बहीण, फोटो काढण्यासाठी नवऱ्या मुलाच्या बाजूला जाऊन बसते आणि पुढच्याच क्षणी त्याला जोरदार पकडून किस घेऊ लागते.
पाहा व्हिडीओ
त्याचबरोबर लोकही उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर butterfly__mahi नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरु शेअर करण्यात आला आहे. ही पोस्ट आतापर्यंत ३ हजारांहून अधिक लोकांनी पाहिली आहे. त्याचबरोबर अनेकांनी हे शेअरही केले आहे. तर सोशल मीडियावर हे लग्न नंतर मोडलं अशा चर्चा आहेत.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले, “इंटरेस्टिंग व्हिडिओ”. दुसर्या यूजरने लिहिले की, ‘फक्त हा दिवस पाहायचा बाकी होता.’ त्याचवेळी तिसऱ्या युजरने लिहिले की, “हे काय चाललंय, अशी मेहुणी नको रे बाबा.”