Viral video: ‘जैसे ज्याचे कर्म, तैसे फळ देतो रे ईश्वर’; आपण जे वागतो, बालतो तेच आपल्यासोबत घडतं हे आपण सगळ्यांनीच आतापर्यंत ऐकलं आहे. तुम्ही एखाद्याला त्रास दिला तर तुम्हालाही कुणीतरी त्रास देईल किंवा तुम्ही एखाद्यासोबत चुकीचं केलं तर उद्या किंवा एक दिवस तुमच्यासोबतही ते घडू शकतं. जसे करावे तसे भरावे अशी म्हण तुम्ही अनेकदा ऐकली असेल. अनेक जण दुसऱ्याचं वाईट चिंतायला किंवा करायला जातात आणि त्यांच्यासोबतच वाईट घटना घडते. याला आपण जसे कर्म तसे फळ असे म्हणतो.
तुम्ही कितीही श्रीमंत, गरीब, सुंदर किंवा कुरूप असला तरीही तुमच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग तुमच्या चांगल्या, वाईट कर्मांवर अवलंबून आहे. आपण केलेल्या चांगल्या कर्माचे फळही आपल्याला मिळते. शिवाय आपण केलेल्या वाईट कर्माचे फळही आपल्याला कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या रूपाने मिळतेच. असं म्हणतात, आताच्या कलियुगामध्ये तर आपण करत असलेल्या वाईट कर्माचे फळ देव लगेच आपल्याला देतो. सध्या अशीच एक घटना दाखवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय, यामध्ये एका रिक्षा चालकाला त्याच्या कर्माची अशी शिक्षा मिळाली आहे की जे पाहून तुम्ही अवाक् व्हाल.
नेमकं काय घडलं?
ही घटना तमिळनाडूमधील कादयानल्लूर या ठिकाणी घडली आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक रिक्षावाला सायकल चालवणाऱ्या मुलाला टपली मारत होता. त्यानं भरधाव रिक्षा पळवली आणि त्या मुलाच्या जवळ जाताच अचानक ब्रेक दाबून रिक्षा स्लो केली. आणि त्यानं टपली मारण्यासाठी हात बाहेर काढला, पण तेवढ्यात नियंत्रण सुटलं आणि अख्खी रिक्षाच पलटी झाली. अगदी पाच सेकंदामध्ये या रिक्षाचालकाला त्याच्या कर्माची शिक्षा मिळाली आहे, तर तो सायकलवरचा तरुण अगदी सहज पुढे निघून गेला आहे.
पाहा व्हिडीओ
अगदी सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास, एखाद्याचे आपण वाईट करण्याचा विचार करतो आणि आपल्या बाबतीतही वाईटच घडते. पण याच उलट जेव्हा आपण एखाद्याला मदत करतो, एखाद्यासाठी काहीतरी चांगलं करतो तेव्हा तेसुद्धा आपल्याला दु्प्पट मिळतं. मग आनंद असो वा दुख: आपण जे दुसऱ्यांना देतो तेच आपल्याला मिळतं, याचं ताजं उदाहरण देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.