Shocking video: सगळ्या भाज्या खाल्ल्या पाहिजेत, असं म्हणत आपण आहारात सर्व भाज्यांचा समावेश करण्याचा प्रयत्न करीत असतो. आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा विचार करीत असलो तरी त्याची दुसरी बाजू गंभीर आहे. कारण- भाजी मंडईभोवती अस्वच्छता वाढली आहे. त्यामुळे आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या पालेभाज्या आरोग्यासाठी अपायकारक ठरत असून, ग्राहक भाजी घेतात की आजार, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

इथपर्यंत ठीक होतं; मात्र सध्या समोर आलेला व्हिडीओ पाहून आता जगायचं की नाही असा सवाल उपस्थित होतोय. कारण- आता विक्रेते बाजारात इतक्या मोठ्या प्रमाणात भेसळ करत आहेत की तुम्ही विचारही करु शकत नाही. भाज्या अस्वच्छ पद्धतीने पिकवणे, अस्वच्छ जागी विकणे यासगळ्यामुळे भाज्या घेणंही लोकांनी कमी केलं आहे. याला पर्याय म्हणून लोक कडधान्य, डाळी खातात. मात्र आता या डाळींमध्येही मोठ्या प्रमाणात भेसळ करत असल्याचं समोर आलं आहे. या फसवणुकीचा एक धक्कादायक व्हिडीओ सध्या समोर आला असून हा व्हिडीओ पाहून तुम्ही कडधान्य डाळी घेताना १०० वेळा विचार कराल हे नक्की…

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

नुकत्याच समोर आलेल्या व्हिडीओमध्ये गृहिणीने मूग विकत आणले होते, मात्र त्याचं शिजवल्यानंतर काय झालं पाहा. ही गृहिणी या व्हिडीओमध्ये सांगते की,ज्याची उसळ बनवण्यासाठी मी रात्री भिजत घातले आणि सकाळी त्याचा रंग हिरवा झाला. म्हणजेच या मूगवरती मोठ्या प्रमाणात केमिकलचा वापर करून त्याला काळा रंग देण्यात आला होता असं तिचं म्हणणं आहे.

काळ्या रंगाचे मुग पौष्टिक असतात म्हणून ते अधिक खाल्ले जातात. पण हिरव्याच रंगाच्या मुगावरती काळा रंग फासून त्याला पौष्टिक भासवणे सुरू आहे. ही मोठ्या प्रकारची फसवणूक ग्राहकांचे केली जात आहे. तसेच हिमाचलसारख्या भागात मिळणारे काळे मुग प्रसिद्ध आहेत. त्यामुळे पर्यटक तिकडे गेले की ते घेऊन येतात. ते खाण्याच्या अनेक फायदे सुद्धा आहेत.पण आता अशा प्रकारची भेसळ समोर येत आहे. त्यामुळे असे मुग खरेदी करावी की नाही असा प्रश्न लोकांना पडला आहे. आपण या व्हिडिओत पाहू शकतो की कुकरमध्ये महिलेने रात्रभर भिजत ठेवलेले मूग आहेत. ज्यात ती महिला आपल्याला मुगाचा गेलेला रंग दाखवत आहे. कुकरमध्ये संपूर्ण काळ पाणी पसरले आहे. म्हणजे सर्व मुगाचा रंग उडाला आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> विजेच्या तारेला स्पर्श झाला अन् २२ सेकंदाचा मृत्यूचा थरार सीसीटीव्हीत कैद; VIDEO पाहून सांगा नेमकं काय चुकलं?

बाजारात आधीच मोठ्या प्रमाणावर आपली फसवणूक होत असते. भेसळयुक्त पदार्थ, प्रक्रिया केलेले पदार्थ खाण्याशिवाय आता आपल्याला पर्याय नाह. कारण- आता सर्वच पदार्थांमध्ये भेसळ केली जाते. त्यामुळेच हल्ली आजारी पडण्याचं प्रमाण वाढलं आहे.

हा व्हिडीओ rj_neha_sharma या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, त्याला आतापर्यंत लाखो व्ह्युज मिळाले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटकरी यावर संताप व्यक्त करीत आहेत. “जगायचं की नाही?”, अशी प्रतिक्रिया एका युजरनं दिली आहे.

Story img Loader