Shocking video: कभी खुशी कभी गम हा ब्लॉकबस्टर चित्रपट २००१ साली आला होता. चित्रपटात अनेक उत्तम गाणी होती. पण, या चित्रपटातील एक गाणे लोकांना खूप आवडले होते आणि ते म्हणजे ‘सूरज हुआ मद्धम’. या गाण्याचे बोल अनिल पांडे यांनी लिहिले आहेत; तर संदेश शांडिल्य यांनी संगीत दिले आहे आणि हे सुपरहिट गाणे अलका याज्ञिक व सोनू निगम यांनी गायले आहे. ‘मैं ठहरा रहा, जमीं चलने लगी’ अशी एक ओळ या गाण्यात आहे. आता तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटत असेल की, आम्ही तुम्हाला या ओळीबद्दल का सांगत आहोत? त्याच कारण असं की, सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा धडकी भरवणारा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही या गाण्याचे बोल आठवतील. हा व्हिडीओ पाहून खरं तर धक्काच बसत आहे.
एकदा निसर्ग कोपला की..
सोशल मीडियावर दररोज वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असल्याचे तुम्ही पाहत असाल. त्यातील अनेक व्हिडीओ असे असतात की, जे पाहिल्यानंतर आपण आश्चर्यचकित होतो. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. माणूस निसर्गावर मात केल्याच्या वारंवार बडेजावी गप्पा मारत असतो. परंतु, निसर्गाने व्यापलेले विश्व आणि त्यात मानवाचे स्थान यांचा विचार केला, तर असे लक्षात येते की, निसर्गापेक्षा माणूस लहानच राहणार आहे. कदाचित त्याला काही प्रमाणात गर्व होत असला तरीही कधीतरी त्या गर्वाचे घर खाली येते. कारण- निसर्गाचा त्याला जबरदस्त फटका बसतो आणि तो निसर्गाच्या हातातले बाहुले असल्याचे प्रत्यंतर येते. एकदा निसर्ग कोपला की, त्याच्यापुढे मानवाचे काहीही चालत नाही. आपण अशा निसर्गाच्या अवकृपेमुळे घडणाऱ्या दुर्घटनांच्या बातम्या नेहमीच वाचत असतो. असाच एक धक्कादायक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
एका निर्णयानं मृत्यूला रोखलं
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्हाला एक कार रस्त्यावर येताना दिसत आहे. सुरुवातीला हा व्हिडीओ सामान्य असल्याचे दिसत आहे. पण काही वेळाने व्हिडीओमध्ये तुम्हाला झाडे, माती व जमिनीचा ढिगारा रस्त्याच्या डाव्या बाजूने मधल्या रस्त्यावर वाहत येताना दिसत आहे. हे पाहिल्यानंतर गाडी चालविणारी व्यक्ती गाडी थांबवते. कारचालक जरा जरी पुढे गेला असता, तर कदाचित तोही वाहून गेला असता. दरम्यान, दूरचा हा धोका ओळखून घेतलेल्या निर्णयामुळे कारचालक थोडक्यात बचावल्याचे दिसत आहे. मुसळधार पावसानंतर भूस्खलनामुळे अनेकदा अशा घटना घडल्याचे दिसून येते.
पाहा व्हिडीओ
दरम्यान, व्हिडीओच्या पार्श्वभूमीवर गाणे वाजते आहे आणि त्याची ओळ ‘मैं ठहरा रहा, जमीन चलने लगी’ आहे; जी व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या व्हिज्युअलला अगदी साजेशी आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @VnsAnuTi नावाच्या अकाउंटसह शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत ४.५ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. त्यावर लोकांकडून अनेक मजेशीर कमेंट्सही येत आहेत. त्यावर एका युूजरने लिहिले की, या रस्त्याची खरोखरच हालचाल सुरू झाली आहे, असं वाटतं. आणखी एका युजरने कमेंट केली आहे की, जर तुम्ही निसर्गाशी खेळाल, तर तुम्हालाही असेच परिणाम मिळतील. “मला कारमालकाचे वाईट वाटते. त्याला आता मागे फिरावे लागेल”, अशी प्रतिक्रिया आणखी एका युजरने दिली आहे.