Viral video: आजकाल धापळीच्या जगात इन्स्टंट सर्व्हिस म्हणून ऑनलाईन जेवण ऑर्डर करण अगदी सोयीचं झालं आहे. हल्ली मोठ्या प्रमाणा ऑनलाईनफूड ऑर्डर करायला प्राधान्य दिले जाते. मोबाईलमुळे सर्व कामं सोपी झाली आहेत. घरबसल्या मोबाईलच्या एका बटनावर शॉपिंगपासून जेवणापर्यंत कोणत्याही वस्तू अगदी सहज मागवू शकतो. ग्राहकांची ही गरज ओळखून अनेक फूड डिलिव्हरी अॅपही सुरु करण्यात आले आहेत. आपल्याला हव्या त्या हॉटेलमधून हवं ते आवडीचे पदार्थ आपण सहज मागवू शकतो आणि तेही काही वेळातच. पण काही वेळा आपल्याला बरे-वाईट अनुभव येत असतात. असाच काहीसा एक विचित्र अनुभव एका ग्राहकाला आला आहे. आपला अनुभव त्याने सोशल मीडियावर शेअरही केलाय. यामध्ये एका तरुणानं झेप्टोवरुन तयर चिकन मागवलं होतं यावेळी त्यात त्याला काय सापडलं पाहाच. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
तुम्हीही ऑनलाईन फूड ऑर्डर करत असाल तर सध्या समोर आलेला व्हिडीओ पाहून तुमचीही झोप उडेल. मांसाहारी पदार्थांमध्ये चिकन खूप आवडीने खाल्ले जाते. तसेच यामध्ये उच्च प्रथिनेयुक्त असते जे शरीरासाठी महत्वाचे असते. जर तुम्हाला नॉनवेज खाणं आवडत असेल तर हा व्हिडीओ पाहा. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हा तरुण दावा करत आहे की त्यानं झेप्टोवरुन मागवलेल्या चिकनमध्ये जिवंत आळ्या आहेत. तो या व्हिडीओमध्ये दाखवत आहे एका कढईमध्ये आळ्या दिसत आहेत. चिकनच्या तुकड्याभोवती अनेक आळ्या रेंगाळताना दिसत आहेत.
बाजारात आधीच मोठ्या प्रमाणावर आपली फसवणूक होत असते. भेसळयुक्त पदार्थ, प्रक्रिया केलेले पदार्थ खाण्याशिवाय आता आपल्याला पर्याय नाही. कारण- आता सर्वच पदार्थांमध्ये भेसळ केली जाते. त्यामुळेच हल्ली आजारी पडण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यात हे असले प्रकार म्हणजे हे जिवावर बोतू शकतं. हिवाळा सुरू होताच मांसाहारी मंडळी चिकनला पसंती देतात. काही व्यक्ती शरीर सुदृढ अर्थात बॉडी बनवण्यासाठी हिवाळ्यात भरपूर चिकन खातात. पण हिवाळ्यात चिकन खाण्याचा विचार करत असाल तर वेळीच सावध व्हा.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ imtaashi नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही संतापजनक प्रतिक्रिया देत आहेत.