Leopard jumped on moving car: बिबट्या हा अत्यंत घातक शिकाऱ्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. गर्द झाडीमध्येही तो अचूक हल्ला करण्याची क्षमता ठेवतो. भक्ष्य कितीही उंचावर असलं तरी देखील तो अगदी सहज गतीनं उड्या मारत वर चढतो. असा खतरनाक प्राणी जर मानवी वस्तीत घुसला तर काय होईल? होय, असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. एका पिसळलेल्या बिबट्यानं एका व्यक्तीवर हल्ला केला. समोर येणाऱ्या प्रत्येकाला हा बिबट्या जखमी करतोय. हा थरारक व्हिडीओ पाहून तुम्ही देखील थक्कच व्हाल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बिबट्या जंगल सोडून मानवी वस्त्यांमध्ये शिरल्याच्या घटना सातत्याने वाढत आहेत. या घटनांमुळे भीती तर वाढत आहेच, पण वारंवार घडून येणारा बिबट्याविरुद्ध मानव हा संघर्ष चिंताजनक आहे. मानवाचा जंगलामध्ये, पर्यायाने जंगलातील व्यवस्थेमध्ये असणारा वाढता हस्तक्षेप आणि अतिक्रमणे यांमुळेच हा संघर्ष निर्माण झाला आहे.

बिबट्या हा जंगलातील भयंकर शिकारी आहे. डोळ्याची पापणी मिटण्याच्या आत तो एखाद्या प्राण्याची शिकार करतो. सोशल मीडियावर बिबट्याच्या शिकारीचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. सध्या असाच एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये बिबट्या एका व्यक्तीवर अचानक हल्ला करताना दिसतो. यानंतर काय होतं ते पाहून तुम्हीही थक्क व्हाल. एक बिबट्या चुकून जंगलातून बाहेर पडून मानवी वस्तीत आल्याचं व्हिडिओत दिसत आहे. त्यानंतर तो लोकांवर हल्ले करू लागतो. या व्हिडिओमध्ये बिबट्या एका वस्तीत शिरताना दिसत आहे. यादरम्यान तो एका व्यक्तीवर हल्ला करतो. बिबट्या अचानक त्या व्यक्तीवर हल्ला करतो, त्यामुळे सुरुवातीला त्याला सावरण्याची संधी मिळत नाही, त्याचवेळी बिबट्या या व्यक्तीच्या खांद्याचा लचका तोडतो. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

पाहा व्हिडीओ

आजकाल धोकादायक प्राण्यांचा वावर मानवी वस्तीकडे जास्त प्रमाणात दिसून येत आहे. रात्री, दिवसा, कोणत्याही वेळी ते बेधडकपणे येऊन लोकांवर, प्राण्यांवर हल्ले करताना दिसत आहे. त्यांच्या भितीपोटी अनेक नागरिकांनी आपल्या घरी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. दिवसेंदिवस प्राण्यांच्या हल्ल्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. नुकतीच एक घटना समोर आली आहे ज्यामध्ये जनावरांवर हल्ला करणारा बिबट्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे.