lion attacks: जगभरात अनेक निरनिराळे प्राणी आढळून येतात. अनेक लोकांना प्राण्यांच्या आयुष्याविषयी जाणून घ्यायचे असते. त्यांची राहणी, जीवनशैली यामध्ये जास्त रस असतो. यासाठी लोक जंगल सफारी, झू मध्ये जातात. वन्या प्राणी म्हटल्यावर कधी काय करतील काही सांगता येत नाही. रागाच्या भरात हल्ला करण्यासही ते मागे पुढे बघत नाही. सोशल मीडियावर तर असे प्राण्यांच्या हल्ल्यांचे अनेक व्हिडीओ समोर येत असतात.अशातच ते पोट भरण्यासाठी कोणाचीही शिकार करताना दिसून येतात. काही वेळा प्राणी हे स्वत:च्या मालकावरही हल्ला करतात. अशाच एका सिंहानं केलेल्या शिकारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक तरुण आपल्या गर्लफ्रेंडला इंप्रेस करण्यासाठी सिंहांच्या पिंजऱ्यात शिरला. आणि शांतपणे झोपलेल्या सिंहांना मुद्दामुन छेडू लागला. परिणामी सिंह भडकले आणि मग त्याची काय अवस्था केली हे आता तुम्हीच पाहा. व्हिडीओ पाहून खरंच तुम्हीही शॉक व्हाल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

डेली मेलनं दिलेल्या वृत्तानुसार ही घटना रशियामधील एक प्राणी संग्रहालयात घडली आहे. तुम्हालाही प्रश्न पडला असेल की नेमकं घजलं तरी काय?. तर १७ डिसेंबर रोजी सकाळी पाचच्या सुमारास झूकीपर इरिस्कुलोव्ह आपल्या गर्लफ्रेंडसोबत गप्पा मारत होता. दरम्यान तिला इंप्रेस करण्यासाठी त्यानं भलतंच धाडस केलं. परिणामी शायनिंग मारण्यासाठी तो सिंहांच्या पिंजऱ्यामध्ये शिरला आणि व्हिडीओ काढू लागला. लक्षवेधी बाब म्हणजे या पिंजऱ्यामध्ये या पिंजऱ्यात ५ सिंह होते. अन् हे सिंह शांतपणे झोपले होते. पण त्यानं आपल्या व्हिडीओसाठी त्यांना झोपेतून उठवलं आणि त्यांच्या डोक्यावर हात फिरवून आपण किती धाडसी आहोत याचं प्रदर्शन करू लागला. याचाच परिणाम त्याला भोगावा लागला आणि जन्मभराची अद्दल घडली. पुढे सिंह भडकले आणि त्यांनी अक्षरश: तरुणाच्या तोंडावर हल्ला करत चेहरा फाडला आणि अंगाचे लचके तोडले.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> प्राण्यांबरोबर चिमुकला करतोय जीवघेणे स्टंट; VIDEO पाहून अंगावर येईल काटा

आपण सर्वांनी प्राणीसंग्रहालयांमध्ये पिंजऱ्याच्या आत बंद असलेले वाघ, सिंह आणि बिबट्या असे हिंस्त्र प्राणी पाहिले असतील. मात्र हेच प्राणी जर अचानक समोर आले तर कोणाचीही अवस्था खराब होईल. मात्र, हे प्राणी पिंजऱ्यात बंद असताना काही लोक त्यांच्याजवळ जात त्यांच्यासोबत मस्ती करण्याचा आणि या प्राण्यांची खोड काढण्याचा प्रयत्न करत असतात. हेच या तरुणानं केलं खेळ खल्लास झाला.

सोशल मीडियावर नावाच्या एक्स अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, ज्याला आतापर्यंत १२ हजारांहून अधिक वेळा पाहण्यात आले आहे, तर अनेकांनी व्हिडिओला लाइकही केले आहे. सोशल मीडिया यूजर्स व्हिडिओवर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले…भाऊ, सिंह हा सिंह असतो, तुम्ही पिंजऱ्यात का घुसलात.